पिंपरी-चिंचवड

कवितेत जीवनाचे सत्त्व दडलेले असते; वर्षा उसगावकर

CD

निगडी, ता. ४ ः आपण जगत असलेल्या जीवनाचे सत्त्व हे मराठीतील कवितेमध्ये दडलेले असते. कविता ही वाचून अधिक चांगली समजते त्यातूनच कवितेची गोडी लागते, असे प्रतिपादन अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी निगडी येथे केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद व मराठी भाषा संवर्धन समितीच्या वतीने पिंपरी चिंचवड वैभव या काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. डॉ. श्रीपाद जोशी, अभय कुलकर्णी, अशोक पगारिया भाऊसाहेब भोईर आदी कवी उपस्थित होते.
प्रत्येक गावाचा एक इतिहास असतो. त्या स्थानाला विशिष्ट एक महत्त्व असते. या पुस्तकातून शहराचा स्थानिक इतिहास समोर आला आहे, असे मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले. यावेळी फिरोज मुजावर व ऋचा राजन यांनी गणेश वंदना सादर केली. राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले. संभाजी बारणे यांनी आभार मानले. गणेश लिंगडे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

बाबो...! 'हा' अभिनेता चक्क विकतोय सिलेंडर, १० लाख रुपयांना एक सिलेंडर आणि...

Latest Marathi News Live Update : धुळ्यात गॅस टंचाईमुळे लाकडांची विक्री वाढली

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, भजी आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

SCROLL FOR NEXT