पिंपरी-चिंचवड

रुपीनगर श्रमिक सोसायटीतील रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी

CD

निगडी, ता. ७ ः रुपीनगर श्रमिक सोसायटीतील कच्च्या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
या परिसरातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंट रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण होत असताना, रुपीनगरमधील पहिली सोसायटी असलेल्या श्रमिक सोसायटीचा रस्ता अद्यापही कच्चाच असल्यामुळे येथील नागरिकांत नाराजी आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
या रस्त्यावरून महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज गैरसोयीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात रस्ता चिखलमय होतो, तर उन्हाळ्यात धूळ प्रचंड उडते. गणेश जयंती व इतर कार्यक्रमांच्या वेळी हा रस्ता पर्यायी मार्ग म्हणून वापरला जातो, तरीही या महत्त्वाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
रुपीनगरमधील इतर सोसायट्यांचे रस्ते सिमेंटचे झाले. पण श्रमिक सोसायटी मात्र अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. याबाबत अनेक वेळा पाठपुरावा केला पण डांबरीकरणास प्रशासन उदासीन दिसत आहे. असे येथील नागरिकांना सांगितले.

ही रुपीनगरमधील सर्वात पहिली सोसायटी असूनही आजपर्यंत आम्हाला कच्च्या रस्त्याचा वापर करावा लागतो. प्रशासनाने आमचा परिसर दुर्लक्षित केला आहे.
- सुरेश जाधव, श्रमिक सोसायटी रहिवासी

इतर सोसायट्या सिमेंट रस्त्यांनी झळाळत आहेत. पण आमच्या रस्त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. काही दिवसांपूर्वी शेजारी असलेल्या माळावर कचऱ्याला आग लागल्याने नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागला तरीही प्रशासनाने अद्याप उपाययोजना केली नाही.
- प्रवीण पगारे, रुपीनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cold Wave Warning Maharashtra : विदर्भात थंडीचा येलो अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज समोर, सतर्कतेचा इशारा

iPhone 15 झाला एकदम स्वस्त! 'या' ठिकाणी मिळतोय 28 हजारपेक्षा जास्त डिस्काउंट

Latest Marathi News Update : विरोधी पक्षनेतेपदाबाबत अफवा, अफवांवर विश्वास ठेवू नका - आदित्य ठाकरे

Mumbai News: मुंबईच्या जलव्यवस्थापनाला बळ! सांडपाणी वाहतुकीसाठी नव्या ‘वॉटर टनेल'ला CRZ मंजुरी; कुठून कुठे असणार मार्ग?

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचा अपघाती मृत्यू, नागपूरहून गडचिरोलीला जाताना दुर्घटना

SCROLL FOR NEXT