पिंपरी-चिंचवड

अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा बोऱ्या

CD

निगडी, ता.२ ः रुपीनगर ते अंकुश चौकापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढतच चालली आहेत.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना टपऱ्यांच्या माध्यमातून अनधिकृत व्यवसाय फोफावले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या थातूरमातूर कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमणे होत आहेत.
रुपीनगर ते अंकुश चौक या मुख्य मार्गावरील टपऱ्यांच्या पुढे टेबले टाकून व्यवसाय केले जात आहेत. मोबाईल विक्री, अनधिकृत हॉटेल्स, सलून, कपड्यांची दुकाने, लाकूड विक्री, फळ-भाजी हातगाड्या, कागद-काच-कचरा गोदामे, मासे विक्री अशा असंख्य बेकायदेशीर व्यवसायांमुळे संपूर्ण भाग म्हणजे बाजारपेठ झाली आहे. यातच भिकारी, तळीरामांमुळे वाढती अस्वच्छता नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. हीच परिस्थिती रुपीनगर येथील वंदे मातरम चौकातही दिसून येते. अनेक बेवारस वाहने रस्त्यावर उभी असून रुपीनगर ते अंकुश चौक परिसरात हे चित्र ठळकपणे पहावयास मिळते. महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक कधीकधी येते. तात्पुरती कारवाई करते आणि गेल्यानंतर काही तासांतच पुन्हा तीच परिस्थिती होते. त्यामुळे कारवाईचा फारसा परिणाम होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हा रस्ता नागरिकांसाठी आहे. अतिक्रमण करणाऱ्यांसाठी नाही. प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. गरज असल्यास योग्य ठिकाणी ‘हॉकर्स झोन’ तयार करूनच व्यवसायाला परवानगी द्यावी.
- राजेश जाधव, रुपीनगर

अतिक्रमणांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना चालणेही कठीण झाले आहे. अतिक्रमणाला कोणीही संरक्षण देऊ नये. नियमित कारवाई झाली पाहिजे. रस्त्यावरील अतिक्रमणांबाबत नियम कडक करावेत.
- मयूर भालेकर, तळवडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS, T20 WC: आराsssssरा खतरनाक! ग्लेन मॅक्सवेलचा रिव्हर्स स्विप अन् पथूम निसंकाचा चपळ झेल; सर्वोत्कृष्ट कॅच Video

Faridabad Factory Fire : 'केमिकल ड्रम्स'चे स्फोट झाल्याने फॅक्टरीत भीषण अग्नितांडव!, दोन पोलिसांसह ३५ जण होरपळले

Latest Marathi News Update : भाजपला उघडे पडणारच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

ILS Law College Fee Case : शुल्क परताव्याबाबत राज्य सरकारने दोन महिन्यांत निर्णय घ्यावा; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT