पिंपरी-चिंचवड

‘जीवाला एकच तहान दिसावे स्वामी गजानन’

CD

निगडी, ता.९ ः जीवाला एकच तहान दिसावे स्वामी गजानन, नाही जगी संत ऐसा गजानना सारखा...यासारख्या एकापेक्षा एक सरस भक्तिरचना सुरेल आवाजात सादर करून प्रसिद्ध ज्येष्ठ गायक पं. अजित कडकडे यांनी रसिकश्रोत्यांना भक्तिरसाचा आनंद दिला.
संत श्री गजानन महाराज १४८ व्या प्रगट दिनाच्या निमित्ताने निगडी येथे श्री गजानन महाराज ट्रस्टच्यावतीने भजन मैफिलीचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये कडकडे यांनी अभंग, भक्ती रचना, गवळणी सादर केल्या.
‘तुम बीन मानत नहीं जिया मोरा’ ही सुंदर रचना सादर करून त्यांनी मैफिलीची सुरुवात केली. ‘नाही जगी संत ऐसा गजानन सारखा’, ‘जीवाला एकच तहान दिसावे स्वामी गजानन’, ‘निःशंक होई रे मना, अशक्य शक्य करतील स्वामी’ ही लोकप्रिय गीत सादर केली. त्यानंतर ‘अवघे गर्जे पंढरपूर’, ‘गुरू परब्रह्म स्वामी गजानन’ व ‘असा कसा देवाचा देव बाई ठकडा’ ही गवळण रसिकांच्या आग्रहास्तव सादर केली. ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’ या लोकप्रिय गीतालाही रसिकांनी टाळ्यांची दाद दिली. रूपक वझे (तबला), दिनकर भगत (पखवाज), प्रकाश वगल (हार्मोनियम) व किशोर दामाये, मुकुंद भद्रानी यांनी त्यांना साथसंगत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT