पिंपरी-चिंचवड

सामाजिक उपक्रमांनी रंगला महाशिवरात्री उत्सव

CD

निगडी, ता. १८ : निगडी प्राधिकरणातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महाशिवरात्री उत्सव धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. मागील ३० वर्षांहून अधिक काळ सातत्याने साजरा होत असलेल्या या उत्सवाने पंचक्रोशीत वेगळी ओळख झाली आहे. या प्रसंगी एक हजार किलो फराळाचे वाटप करण्यात आले.
हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर भोसरीतील संजीवनी ब्लड बँक यांच्या सहकार्याने पार पडले. सुमारे ९० भाविकांनी या वेळी रक्तदान केले. पल्लवी पांढरे यांनी स्थापन केलेल्या ‘स्नेहसरिता’ महिला गटातील महिलांनी उत्सवात सहभाग घेतला.
तसेच नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, शैलजा मोरे, शर्मिला बाबर व विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, प्रदेश अध्यक्ष भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य अनुप मोरे व सामाजिक कार्यकर्ते अमोल भोईटे, मैत्री महिला व्यासपीठच्या अध्यक्षा अपर्णा मिसाळ यांचा मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण पुरोहित, राहुल काळे, रमेश कस्तुरे, उमाजी शिंदे आदींनी नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: माळेगाव कारखान्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संचालकपदी बिनविरोध; संचालक मंडळाच्या विशेष सभेत निर्णय!

Viral Video : तुम्हीही नाश्त्यात पोहे आवडीने खाता ? व्हायरल व्हिडिओ पाहून उघडतील डोळे

PAK vs NAM सामन्यावर पावसाचे ढग; ऑस्ट्रेलियासारखीच पाकिस्तानची अवस्था होणार? नेमकं कसं आहे समीकरण

Latest Marathi News Live Update : सातारा नगरपरिषदेच्या ‘अघोरी नृत्या’ला अंनिसचा विरोध

Railway Loco Pilots: प्रशासनाकडून दबाव, तणावपूर्ण कामकाज अन्...; मुंबई लोकलच्या लोको पायलटांचा सामूहिक VRS अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT