पिंपरी-चिंचवड

भैरवनाथ संघाला कबड्डीचे विजेतेपद

CD

निगडी, ता.२१ ः छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गणेश मित्र मंडळ आणि तळवडेच्या गणेशनगर येथील शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित मॅटवरील कबड्डी स्पर्धेत भोसरीचा भैरवनाथ कबड्डी संघाने विजेतेपदासह ३३ हजार ३३३ रुपयांचे पारितोषिक पटकाविले.
पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यामधील निमंत्रित संघ सहभागी झाले. अंतिम लढतीमध्ये भैरवनाथ कबड्डी संघाने युवा बॅनर संघावर ३५- १२ असा विजय मिळविला. उपविजेत्या युवा बॅनर संघाला २२ हजार २२२ रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तृतीय क्रमांकाच्या संघाला ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. याबरोबरच उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट अष्टपैलू अशी चषक व रोख रक्कम स्वरूपातील पारितोषिकेही देण्यात आली. गणेश मित्र मंडळाने यंदा ‘डीजे’ मुक्त शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अंतर्गत शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर व मंडळाच्या सहकार्याने ही स्पर्धा भरविण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT