निगडी, ता. २७ ः ‘समाजात अज्ञानातून आणि बेसावधपणातून होणारे मतांतर हे राष्ट्रांतर असते, आपण देव धर्माच्या नावे देत असलेल्या दानाचाही नेमका काय उपयोग केला जातो याबाबत नक्की माहीत असली पाहिजे,’ असे प्रतिपादन डॉ. गौतम खट्टयांनी केले.
ग. दि. माडगूळकर नाट्यगृह स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार २०२६’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वर्षी तेलंगणमधील नलगोंडा येथील रामावत नर्यानाईक यांना राष्ट्रीय पुरस्कार, तर अकोला येथील गजानन सोलकर यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह व प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते.
राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचा समन्वय साधणारे राष्ट्र हीच सावरकर यांची संकल्पना असल्याचे डॉ. खट्टर यांनी सांगितले. धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या परखड विचारांचीही त्यांनी आठवण करून दिली.
मंडळाच्या वतीने गेल्या सतरा वर्षांपासून राष्ट्रनिष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात येत असून योग्य कामाची दखल घेऊन माहित नसलेली व्यक्ती व कार्य यांचा परिचय होत आहे.
रामावत नर्यानाईक यांनी नलगोंडा जिल्ह्यात सात हजारांपेक्षा अधिक धर्मांतरित हिंदूंची घरवापसी घडवून आणल्याचा उल्लेख करण्यात आला. त्यांनी गोरमाटी भाषेत मनोगत व्यक्त केले. अंधश्रद्धा व अज्ञानामुळे धर्मांतर नव्हे, तर मतांतर घडते; ‘मतांतर’ हा शब्द अधिक योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गजानन सोलकर यांनी अकोला जिल्ह्यातील ५३ पैकी ४१ गावांमध्ये घरवापसीचे कार्य केल्याचे सांगितले. सावरकरांच्या नावाने मिळालेला हा सन्मान म्हणजे पुनर्जन्मच असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, ग्रंथपूजन व शस्त्रपूजनाने झाली. सचिव ॲड. हर्षदा पोरे यांनी प्रास्ताविकातून मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. शैलेश भिडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. नारायण देशपांडे यांनी आभार मानले. पुरस्काराच्या मानकऱ्यांनी केलेल्या कार्याबाबत ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. विराज सवाई यांनी सूत्रसंचालन केले. शुभांगी डोंगरे यांनी सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली.
-----
फोटो
99409
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.