पिंपरी-चिंचवड

तळवडेतील ग्रामस्थांकडून वारकऱ्यांची सेवा

CD

निगडी, ता.४ ः जगद्‍गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र देहू येथे राज्याच्या कानाकोपऱ्यांमधून येत असलेल्या वारकऱ्यांची सेवा घडावी या हेतूने तळवडेमधील ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि उद्योजकांच्यावतीने त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी, फराळाचे पदार्थ, बैठक आणि भोजन व्यवस्था केली जात आहे.
देहू -आळंदीच्या मार्गावरील वारकरी संप्रदायाचा प्रभाव असणारे गाव म्हणजे तळवडे. दरवर्षी श्री तुकाराम महाराज बीजेसाठी अनेक वारकरी शिक्षण संस्थांच्या दिंड्या आळंदी - देहू असा प्रवास करीत असतात. या दिंड्यांतील वारकऱ्यांसाठी अनेक जण वैयक्तिक पातळीवर आपल्या पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करतात.
श्री क्षेत्र देहू येथे बीजेनिमित्त दरवर्षी तळवडे ग्रामस्थांच्यावतीने अखंड हरिनाम सप्ताह चालतो. तेथेही मोठ्या प्रमाणात अन्नदान व वारकऱ्यांना सोयी- सुविधा पुरविण्यात येते. विशेषतः कडक ऊन असल्यामुळे पाण्याच्या पाण्यासाठी सोय केली जात आहे. तसेच केळी वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच चतुर्थी असल्यामुळे काहींना उपवास असू शकतो. त्यादृष्टीने फराळाच्या पदार्थ तयार केले जात आहेत. कित्येक वर्ष परंपरेने ही सेवा सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

हॉटेलचालकांचीही सेवा
देहू - आळंदी रस्त्याच्या दोन्हीही बाजूने महापालिका कर्मचारी स्वच्छता करताना दिसत होते. कचरा उचलून टाकला जात होता. स्वच्छता व वाहतूक व्यवस्थेसाठी नियोजन केले जात आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी वारकऱ्यांच्या सुविधेसाठी ताक, थंड पेयाची व्यवस्था केली आहे.

सर्वसामान्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी प्रचंड मोठे काम संत तुकाराम महाराज यांनी केले आहे. त्यांच्याबद्दल समाजात आदर भावना फार मोठी आहे. त्यामुळे वाटेत जागोजाग समाज दिंडीची सर्वभावे मोठी सेवा घडते. काहीही कमीच पडत नाही. संतांनी केलेले उपकार कधीही फेडता येणार नाहीत.
- प्रकाश महाराज जंजिरे, कीर्तनकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

Safe Investment : अमेरिका–इराण युद्धाने शेअर बाजार हादरला! घाबरू नका… या 6 गुंतवणुकीत तुमचे पैसे राहतील सुरक्षित

Latest Marathi News Live Update : पुण्यासह राज्यात उन्हाचा तडाखा, सलग दोन दिवस कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली

Budget 2026: यंदा राज्य सरकारची कसरत! तूट, कर्जामुळे योजना व विकासाचा समतोल साधण्याचे आव्हान

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपाचा शेअर बाजारात डंका! २०० कोटींच्या 'ग्रीन बॉण्ड'ला ५४० कोटींचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT