निगडी, ता.७ ः रुपीनगर येथे शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथून शिवज्योत आणण्यात आली. वाद्य पथकाच्या पारंपरिक ढोल - ताशा वादनाने शिवरायांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर प्रसिद्ध कीर्तनकार कबीर महाराज अत्तार यांचा शिवचरित्रावर कीर्तनाचा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी नगरसेवक पंकज भालेकर, दादासाहेब नरळे, धनंजय भालेकर, विलास भालेकर, दयानंद भालेकर, शरद भालेकर, नितीन बोंडे, विशाल मानकरी, कल्पेश गोरड, पांडुरंग कदम, बाबासाहेब दळवी आदी उपस्थित होते.
अत्तार महाराजांनी ओघवत्या वाणीने शिवाजी महाराजांना घडविण्यासाठी जिजाऊ मासाहेबांनी घेतलेले कष्ट, असंख्य मावळ्यांच्या त्याग आणि बलिदानातून उभे राहिलेले स्वराज्य या सर्वच विषयांवर कीर्तन सादर केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल भालेकर यांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.