पिंपरी-चिंचवड

निगडीत फुलांची आरास, तर आकुर्डी महालाची सजावट

CD

आकुर्डी, ता. १५ : आकुर्डी, निगडी प्राधिकरणमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी हलते, जिवंत देखावे यासह भव्य महाल साकारले आहेत. तर निगडीतील प्राधिकरणामध्ये अनेक मंडळांनी फुलांची सजावट साकारून विविध स्पर्धा, उपक्रमांचे आयोजन केले आहे.

फुलांची सजावट
निगडीतील यमुनानगर येथील गजराज मित्र मंडळाने यंदा फुलांची आकर्षक सजावट केली आहे. मंडळाचे
२४ वे वर्ष आहे. अध्यक्ष ऋषिकेश गुंजाळ हे आहेत.

विठ्ठल-रुक्मिणी गणेशमूर्ती
निगडीतील यमुनानगर येथील सिद्धिविनायक मित्र मंडळाचे १० वे वर्ष आहे. यावर्षी मंडळाने भव्य विठ्ठल- रुक्मिणी गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली असून फुलांची आकर्षक सजावट केली आहे. ज्ञानेश्वर पुरोहित हे अध्यक्ष आहेत.

बालाजी महालाची प्रतिकृती
यमुनानगर येथील सुवर्णयोग मित्र मंडळाचे ३१ वे वर्ष असून मंडळाने यंदा बालाजी महालाची प्रतिकृती साकारली आहे. विवेक गवळी हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

गज गणपती मूर्ती
यमुनानगर, निगडी येथील शिवराज तरुण मित्र मंडळ २३ वे वर्ष आहे. यावर्षी मंडळाने फुलांच्या सजावटीत गज गणपती मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली आहे. अध्यक्ष आकाश शेंडे हे आहेत.

हनुमान गढी महल
निगडी गावठाणातील जय बजरंग तरुण मंडळाने ६९ व्या वर्षी ‘हनुमान गढी महल’ची प्रतिकृती साकारली आहे. दत्ता पवळे हे अध्यक्ष आहेत.

पंढरीची वारीचे महत्त्व
निगडीतील टिळक चौकातील जय भवानी तरुण मंडळाने यावर्षी पंढरीची वारी हा हलता देखावा सादर केला असून त्याद्वारे पंढरीच्या वारीचे महत्त्व पटवून दिले आहे. दिनेश काळभोर हे अध्यक्ष आहेत.

गणेश रथाची सजावट
निगडी गावठाणातील ओम शिवतेज मित्र मंडळाचे (निगडीच्या राजा) ३१ वे वर्ष आहे. मंडळाने गणेश रथासह आकर्षक सजावट केली आहे. अध्यक्ष समीर जावळकर हे आहेत.‌

शंकर, पार्वती देखावा
निगडी गावठाणातील स्वगतम मित्र मंडळाने शंकर पार्वतीचा देखावा व विद्युत रोषणाई केली आहे. मंडळाचे अध्यक्ष सागर लष्करे हे आहेत.

फुलांची आरास
प्राधिकरणातील सेक्टर २५ मधील वरदविनायक मंडळाचे १७ वे वर्ष असून फुलांची सजावट केली आहे. तुषार कुलकर्णी हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

फुलांची सजावट
प्राधिकरण सेक्टर २५ मधील सिंधुनगर युवक मित्र मंडळाचे (प्राधिकरणातील मानाचा पहिला गणपती) ४५ वे वर्ष असून यावर्षी मंडळाने फुलांची सुंदर सजावट केली आहे. योगेश पवार हे अध्यक्ष आहेत.

हिंदवी स्वराज्य
प्राधिकरण सेक्टर २७ मध्ये शरयुनगर प्रतिष्ठानने ४५ व्या वर्षी ‘हिंदवी स्वराज्य’ यावर हलता देखावा तयार केला आहे. सुमीत शिंगी हे अध्यक्ष आहेत.

शंकर-पार्वती यांच्या लग्नाची वरात
प्राधिकरण सेक्टर २८ मधील जयहिंद मित्र मंडळाचे ३९ वे वर्ष असून यावर्षी त्यांनी ‘शंकर-पार्वती यांच्या लग्नाची वरात’ यावर हलता देखावा सादर केला आहे. मंडळांचे अध्यक्ष राजेश फलके हे आहेत.

फुलांची सजावट

आकुर्डीतील विठ्ठलवाडीमध्ये शिवसंघर्ष मित्र मंडळाने ११ व्या वर्षी फुलांची सजावट केली आहे. मंडळाचे अध्यक्ष सूरज पवार हे आहेत.‌

गडकिल्ल्यांचे संवर्धन, महिलांचे संरक्षण
आकुर्डीतील विठ्ठलवाडीमध्ये श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळाने ३२ व्या वर्षी ‘गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि महिलांचे संरक्षण’ यावर हलता देखावा सादर केला. शिवाजी सूर्यवंशी हे अध्यक्ष आहेत.

फुलांची आकर्षक आरास
आकुर्डीमधील विठ्ठलवाडी येथील अखिल अष्टविनायक मित्र मंडळाने १६ व्या वर्षी फुलांची सजावट साकारली आहे. मंडळाचे अध्यक्ष शुभम वायकर हे आहेत.

नेत्रदीपक विद्युत रोषणाई
आकुर्डीतील विठ्ठलवाडी येथील गणेश कामगार मंडळाचे ५५ वे वर्ष असून मंडळाने यावर्षी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. शाम तरटे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

भव्य श्रीराम गणेशमूर्ती
तुळजाई वस्ती आकुर्डी येथील श्री तुळजामाता मित्र मंडळाने ४८ व्या वर्षी आकर्षक राज महालासह भव्य श्री राम गणेशमूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली आहे. मंडळाचे अध्यक्ष यश काळभोर हे आहेत.

भव्य श्रीराम महाल
आकुर्डीमधील तरूण मित्र मंडळाचे ६४ वे वर्ष आहे. मंडळाने भव्य श्रीराम महाल साकारला आहे. मंडळाचे अध्यक्ष उल्हास शेट्टी हे आहेत.

झोपाळ्यावर फुलांची आरास
आकुर्डीतील दत्तवाडी येथील श्री समर्थ मित्र मंडळाचे ४८ वे वर्षी आहे. मंडळाने भव्य झोपाळ्यावर फुलांची आरास केली आहे. मंडळाचे अध्यक्ष गुलाब कुटे हे आहेत.

काल्पनिक मंदिर
आकुर्डीमधील विठ्ठलवाडी येथील एकता मित्र मंडळाने २८ व्या वर्षी काल्पनिक गणेश मंदिर साकारले आहे. मंडळाचे अध्यक्ष फारुक शेख हे आहेत.

शाहिस्तेखानाची फजिती
आकुर्डी गावठाणामधील हनुमान तरुण मंडळाने ६५ व्या वर्षी ‘स्वारी लाल महालाची, फजिती शाहिस्तेखानाची’ यावर जिवंत देखावा सादर केला आहे. मंडळाचे अध्यक्ष विजय काळभोर हे आहेत.

शिवरायांचा आठवा प्रताप
आकुर्डी गावठाणमधील नागेश्वर मित्र मंडळाने ४५ व्या वर्षी ‘शिवरायांच्या आठवा प्रताप व शिवरायांचे आठवावे रूप’ यावर जिवंत देखावा सादर केला आहे. मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश कुटे हे आहेत.

फुलांची सजावट
आकुर्डी गावठाणातील नवनाथ मित्र मंडळाने फुलांची आकर्षक सजावट केली आहे. अनिकेत पाडाळे हे अध्यक्ष असून मंडळाचे ५३ वे वर्ष आहे.

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती..
शिवशक्ती मित्र मंडळाने ४८ व्या वर्षी ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. मंडळांचे अध्यक्ष रोहित कदम हे आहेत.

आता तरी शहाणे व्हा...
भैरवनाथ मित्र मंडळाने (वडाखालचा गणपती) ५५ व्या वर्षी ‘आता तरी शहाणे व्हा’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. करण इल्लाळे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

अष्टविनायक महल
जय राष्ट्र मित्र मंडळाने यंदाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी अष्टविनायक महल साकारला आहे. मंडळाचे अध्यक्ष दीपक काळभोर हे आहेत. योगायोग मित्र मंडळाने फुलांची आकर्षक सजावट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT