आकुर्डी, ता. ४ : आयुष्यात नियतीने ‘काळोख’ पेरला असताना देखील त्यावर मात करत आकुर्डीमधील ‘आधार’ आश्रमातील अनाथ आणि निराधार मुला-मुलींनी आपल्या जीवनात हसत-खेळत ‘प्रकाश’ तेवत ठेवला आहे. त्यांनी यंदाचीही दिवाळी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी केली. अनेक दानशूरांनी दिवाळीनिमित्त कधी फराळ; तर कधी वेगवेगळे उपहार देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.
दिवाळीचा सण प्रकाश पर्व म्हणून देशभरात उत्साहात साजरा केला जातो. कुठे नवीन कपडे घालून तर कुठे फराळाचा आस्वाद घेत अन् फटाक्यांच्या आतषबाजी करून दिवाळी साजरी होते. सर्वजण परिवारासोबत सणाचा आनंद घेत असतो. परंतु, समाजातील काही घटक त्यापासून वंचित राहताना दिसतात. त्यापैकीच एक म्हणजे अनाथ आश्रमातील लहान मुले. मात्र, या मुलांसाठी दिवाळीचा उत्सव अधिक खास आणि आनंददायी करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती आणि स्वयंसेवी संघटना पुढे सरसावत आहेत.
आतापर्यंत अडीचशे मुले दत्तक
अशाच निरागस अनाथ आणि निराधार लहान मुलांसाठी एक मदतीचा हात पुढे करण्यासाठी राज्य शासन मान्यता प्राप्त ‘आधार’ ही संस्था गेल्या ३३ वर्षांपासून लहान मुलांसाठी काम करत आहे. या संस्थेची सुरवात पुण्यातील हरी परशुराम वैद्य (खडीवाले) यांनी केली. सुरवातीला या आश्रमात आदिवासी मुले होती. त्यानंतर, संस्थेत हळूहळू बेवारस सोडून देण्यात आलेली मुले दाखल होत गेली. गेल्या ३३ वर्षांमध्ये या संस्थेमार्फत आतापर्यंत अडीचशे मुले दत्तक देण्यात आली आहेत.
दिवाळीचा आनंद अन् उत्साह
आधार संस्थेमार्फत दरवर्षी प्रत्येक सण साजरा केला जातो. त्यानुसार, लहान मुलांनी दिवाळी देखील पारंपरिक पद्धतीने साजरी केली. त्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. अनेक दानशूरांनी या मुलांना कधी फराळ; तर कधी वेगवेगळे उपहार देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणले.
संस्थेतील लहान मुलांना नेहमी घरासारखे वातावरण दिले जाते. शिवाय, आपला सगळ्या गोष्टी इथे आल्यावर विसरायला होतात. आपण जेवढं मुलांना देतो. त्यापेक्षा कितीतरी पट ही मुले आपल्याला परत देत असतात. जे प्रेम देऊ शकतात आणि मुलांना समजू शकतात. अशा लोकांचे आश्रमात नेहमीच स्वागत केले जाते.
- डॉ. मेधा अय्यर, अध्यक्षा, आधार संस्था, आकुर्डी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.