gautami patil and surekha punekar sakal
पिंपरी-चिंचवड

Surekha Punekar : गौतमी पाटीलची लावणी नव्हे, डीजे डान्स; सुरेखा पुणेकर यांची टीका

चिंचवड येथे २५ आणि २६ मार्चला राज्यस्तरीय महालावणी स्पर्धा होणार आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी रविवारी चिंचवड येथे पत्रकार परिषद झाली. त्यावेळी सुरेखा पुणेकर बोलत होत्या.

सकाळ वृत्तसेवा

चिंचवड येथे २५ आणि २६ मार्चला राज्यस्तरीय महालावणी स्पर्धा होणार आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी रविवारी चिंचवड येथे पत्रकार परिषद झाली. त्यावेळी सुरेखा पुणेकर बोलत होत्या.

पिंपरी - कलावंत पोट भरण्यासाठी धडपडतो. पोटासाठी प्रत्येकजण काहीतरी करतो. मात्र, जे करायचे आहे, ते चांगले करावे, अंगविक्षेप नको, असे मत लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केले. तसेच गौतमी पाटील हिची लावणी नसून, तो डीजे डान्स आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

चिंचवड येथे २५ आणि २६ मार्चला राज्यस्तरीय महालावणी स्पर्धा होणार आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी रविवारी चिंचवड येथे पत्रकार परिषद झाली. त्यावेळी सुरेखा पुणेकर बोलत होत्या. भाजपच्या आमदार उमा खापरे, माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यावेळी उपस्थित होत्या.

सुरेखा पुणेकर म्हणाल्या, ‘लावणीचे अनेक प्रकार आहेत. आजच्या तरुण कलावंतांनी लावणी समजून घेतली पाहिजे. ती शिकून घेतली पाहिजे. माझ्याकडे आल्यास त्यांना मी लावणी शिकवू शकते. कलावंत असलेल्या तरुणींनी अंगभर साडी नेसून, लावणी सादर करावी. त्यामुळे ही कला जिवंत राहण्यास मदत होईल. त्यासाठी लावणी आजच्या पिढीपर्यंत पोचली पाहिजे. मात्र, काही कलावंत तसे करताना दिसत नाहीत. मात्र, आपण लावणीची विटंबना होऊ देणार नाही.’

तमाशाचा ऑर्केस्ट्रा झालाय...

लावणीमध्ये सवाल-जवाब हा प्रकार सध्या पहायला मिळत नाही. त्यासाठी कलावंतांनी प्रयत्न केले पाहिजेत. तमाशाचेही असेच झाले आहे. सध्या तर तमाशाचा ऑर्केस्ट्रा झाला आहे. तमाशातील वगनाट्य हा प्रकार मागे पडत आहे. याला कलाकारच जबाबदार आहेत. आपण आपली पारंपरिक कला लोकांपर्यंत पोचविली पाहिजे, असे आवाहन सुरेखा पुणेकर यांनी केले.

कथ्थक व लावणी जुळ्या बहिणी

लावणी हा एक उत्तम कलाप्रकार आहे. तसेच नृत्यामध्ये कथ्थक देखील शास्त्रीय कला प्रकार आहे. कथ्थक व लावणी म्हणजे कला प्रकारातील जुळ्या बहिणीच आहेत. लावणी कला टिकून राहण्यासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे, असे मत सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"तो गेला तेव्हा मी इथे नव्हतो" अतुल परचुरेंना शेवटचं न भेटल्याबद्दल दिगंबर यांनी व्यक्त केली खंत

LPG supply India news : आनंदाची बातमी! गॅस टंचाई दूर होणार, स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून २० हजार ४०० मेट्रिक टनाचे एलपीजी मुंबईकडे रवाना

Latest Marathi News Live Update : शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते कांदिवली लोखंडवाला १२० फूट डीपी रोडचे भूमिपूजन

Varuthini Ekadashi 2026: वरूथिनी एकादशीला शिवलिंगावर अर्पण करा 'या' ५ वस्तू; घरातील गरिबी दूर होऊन येईल पैसाच पैसा!

Mumbai News: यूपी-बिहार आणि अन्य शहरातून येणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबईत परवडणारी घरे मिळणार; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT