पिंपरी-चिंचवड

जुनी सांगवीतील शिवसृष्टी उद्यान-

CD

रमेश मोरे

जुनी सांगवी हे मुळा पवना नद्यांच्या संगमावर वसलेले गाव ते उपनगर पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे प्रवेशद्वार. सांगवीतील लक्ष्मीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा बालपणापासूनचा इतिहास भिंती शिल्पाद्वारे साकारण्यात आलेले स्व.तानाजीराव शितोळे (सरकार) उद्यान (शिवसृष्टी) हे शहरातील पहिले उद्यान आहे. शहरातील मॉडेल वॉर्ड संकल्पनेची सुरूवात सांगवीतून झाली.याचबरोबर प्रशस्त रस्ते, पाणी पुरवठा, इतर सोयीसुविधासोबत येथे उद्याने उभारण्यात आली.यातीलच एक प्रमुख शिवसृष्टी उद्यान
सुमारे दोन एकर परिसरात उभारलेले आहे.

वैशिष्ट्ये
- छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भिंती शिल्पातून साकारण्यात आला आहे
- दगडी चिरेबंदी गड कोटांची प्रतिकृती असलेले भव्य प्रवेशद्वार
- प्रवेशद्वारासमोर स्वागताला हत्तींच्या आकर्षक प्रतिकृती
- प्रवेशद्वारासमोर मशाल हाती घेवून पहारा देणाऱ्या मावळ्यांच्या प्रतिकृती
- प्रवेशद्वारावर स्वागतासाठी सज्ज असलेल्या हत्तींच्या आकर्षक प्रतिकृतीमुळे बालचमूत हत्ती गार्डन म्हणूनही हे प्रसिद्ध
- शहरातील पहिले दुमजली ध्यानधारणा केंद्र, सभागृह
- बालचमूंसाठी खेळणी, व्यायामासाठी ओपन जीम साहित्याची व्यवस्था
- हिरवळ, विविध फुलझाडे, उद्यान परिसरात गोलाकार लावण्यात आलेली विविध झाडे

भिंतीशिल्पे
- दार उघड बया ः संत एकनाथ महाराजांवर आधारित भिंतीशिल्प
- जिजाऊंचा रौद्रावतार ः आऊसाहेबांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य
- शिवजन्म, राजमाता जिजाऊंचे संस्कार, शिवरायांचे खेळ, शिवरायांचे प्रशिक्षण, सोन्याचा नांगर, कसबा गणपती पुर्नप्रतिष्ठापना, स्वराज्य शिदोरी, शिवरायांची सवंगड्यासोबत कांदा भाकरी, संत शिरोमणी तुकाराम महाराज कीर्तन, शिवरायांची सवंगडी मावळ्यांसह स्वराज्याची शपथ, स्वराज्याचे तोरण, रांझ्याचा पाटील, शिवरायांची पितृभक्ती, ऐलिफंटा केव्हज, शिवरायांचे आरमार, प्रतापगड निवासिनी भवानी माता, घोड्यांच्या पागा, अफजलखानाचा वध, शाहीर अज्ञानदास, पावन खिंड-वीर बाजीप्रभू देशपांडे, लालमहाल-शाहिस्तेखानाची फजिती, राजमाता जिजाऊंची सुवर्णतुला, आग्रा दरबार, आग्र्याहून सुटका, छत्रसाल बुंदेला, वीर तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, नेताजी पालकरांचे शुद्धीकरण, भागानगरीतील स्वागत, श्री शैल मल्लिकार्जुन, शिवभूषण अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील प्रसंगावर आधारित भिंतीशिल्पातून ते प्रसंग साकारण्यात आलेले आहेत. जागोजागी मेघडंबरी, दगडी बांधकाम यामुळे उद्यानाची पारंपरिक शिवकालीन बांधकामाची ओळख प्रतिबिंबित होते.

(संतोष हांडे ः सकाळ छायाचित्रसेवा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT