पिंपरी-चिंचवड

सांगवीतील वेताळ महाराज,संत गोरोबा कुंभार उद्यानाची दुरवस्था -नविन मोठ्या उद्यानामुळे जुन्या उद्यानांकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष

CD

जुनी सांगवीतील जुनी उद्याने वाऱ्यावर
देखभालीअभावी बकालपणा ः रंग उडालेली खेळणी, खड्डे, अस्वच्छतेमुळे दुरवस्था

जुनी सांगवी, ता. ४ ः जुनी सांगवी येथील पवना नदी काठावरील महापालिकेचे वेताळ महाराज उद्यान व मुळा नदी किनारा रस्त्यालगत असलेले संत गोरोबा कुंभार उद्यानाची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने या जुन्या उद्यानांना बकालपणा आला आहे.
जुनी सांगवी येथे लक्ष्मीनगर जयमाला नगर भागात महापालिकेचे स्व. तानाजीराव शितोळे सरकार (शिवसृष्टी) उद्यान, मधुबन सोसायटी मुळा नदी किनारा भागात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान व पी. डब्लू. डी. भागात संत सावतामाळी उद्यान ही मोठी उद्याने आहेत. या तुलनेत संत गोरोबा कुंभार उद्यान व वेताळ महाराज उद्यानात रंग उडालेली खेळणी, खेळण्या भोवतीची समुद्री वाळू निघून पडलेले खड्डे, अस्वच्छता, प्रवेशद्वाराच्या बाजूला नागरिकांकडून टाकण्यात येणारा कचरा यामुळे दुरवस्था होऊन उद्यानाला बकालपणा आला आहे. संत गोरोबा कुंभार उद्यानातही अशीच परिस्थिती आहे. या उद्यानातील सूचना फलक गंज लागलेल्या अवस्थेत आहे. खेळण्यांचा रंग उडालेला आहे. सुकलेली हिरवळ, त्या सोबत उगवलेले इतर गवत झाडांची नियमित देखभाल व छाटणी होत नाही. मोठ्या पावसात या उद्यानाला पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. दोन वर्षांपूर्वीच येथील सीमाभिंत व इतर सुशोभीकरणाचे काम करण्यात आले होते. सद्यस्थितीत देखभाल दुरुस्तीच्या अभावामुळे या दोन्ही उद्यानाला बकालपणा आला आहे.

मोकाट कुत्र्यांचा वावर
- वेताळ महाराज उद्यानात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यामुळे लहान मुले व पालक या उद्यानात येण्यास धजावत नाहीत. याचबरोबर प्रवेशद्वारासमोरच नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याने नागरिकांना कचऱ्यातून वाट काढत उद्यानात जावे लागते.
पवना गणपती विसर्जन घाटालाही यामुळे बकालपणा आला आहे. या घाटाचे बांधकाम सुशोभीकरणाचे काम नुकतेच करण्यात आले आहे. येथील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात यावीत, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.


कोट-
‘‘इतर उद्यानांच्या तुलनेत या दोन उद्यानांकडे लक्ष दिले जात नाही. उद्यान विभागाने नियमित देखभाल दुरुस्ती करून लक्ष द्यावे.
- ओंकार भागवत, कार्याध्यक्ष, सांगवी विकास मंच.

‘‘उद्यानालगत मोकळ्या जागेत रात्रीच्या वेळी नागरिकांकडून कचरा टाकला जातो. येथील कचरा नियमित उचलण्यात येतो. येथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील.
- दीपक कोटीयाना, आरोग्य निरीक्षक, सांगवी.
कोट-
‘‘दोन्ही उद्यानांची नियमित देखभाल व स्वच्छता करण्यात येते.
- राजाराम शिरसाठ, सहायक उद्यान निरीक्षक.

फोटो ओळ-१)
जुनी सांगवी ः वेताळ महाराज उद्यानालगत टाकण्यात येणारा कचरा.
२) जुनी सांगवी ः वेताळ महाराज उद्यानात रंग उडालेली खेळणी व भटक्या कुत्र्यांचा वावर
३) जुनी सांगवी ः देखभाल, दुरुस्तीच्या अभावामुळे संत गोरोबा कुंभार उद्यानाला आलेला बकालपणा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT