पिंपरी-चिंचवड

रस्त्यावर पडलेल्या फांद्या कधी हटवणार जुनी सांगवी परिसरातील नागरिकांचा प्रश्‍न, अपघाताचा धोका

CD

जुनी सांगवी, ता. ७ ः जुनी सांगवी परिसरात आठवड्यापूर्वी आलेल्या वादळी पावसाने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या होत्या तर अनेक ठिकाणी, झाडांच्या फांद्या तुटून नुकसान झाले होते. मुळा नदी किनारा रस्ता, पवार नगर येथे झाडांच्या फांद्या तुटून आठवडा उलटला तरी उद्यान विभागाकडून येथील फांद्या हटविण्यात आल्या नाहीत. याचबरोबर अवकाळी येणाऱ्या वादळी पावसामुळे हा रस्ता रहदारीचा असल्याने अपघाताचा संभाव्य धोका असल्याने येथील झाडांच्या तुटलेल्या फांद्या त्वरित हटविण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
गेल्या आठवडाभरापासून येथील झाडांच्या फांद्या लोंबकळत पडलेल्या आहेत. अचानक पुन्हा पाऊस व वारे आल्यास रहदारीचा रस्ता असल्याने अपघात होऊ शकतो, अशी माहिती स्थानिक नागरिक बबन शितोळे यांनी दिली.

‘‘उद्यान विभागाकडून परिसरातील पडलेली झाडे व फांद्या हटविण्यात आल्या आहेत. येथील फांद्या तत्काळ हटविण्यात येतील.
-सुरेश घोडे, निरीक्षक, उद्यान विभाग.


जुनी सांगवी : पवारनगर येथे आठवड्यापूर्वी वादळी पावसात झाडांच्या तुटलेल्या फांद्या अद्याप लोंबकळत आहेत.

फोटोः 15689, 15690

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deputy CM Eknath Shinde : 'त्या' विरोधकांसाठी मोफत दवाखाना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; ‘पोटदुखी’ होणाऱ्यांना टोला, नेमकं काय म्हणाले?

E-Vehicle: 'ई-वाहन' खरेदीदारांना सीएम योगींची मोठी भेट; नोंदणी आणि रोड टॅक्समध्ये दोन वर्षांची वाढीव सूट!

Trupti Desai: सासपडेतील संशयिताचा एन्काउंटर करा: तृप्ती देसाई; पीडित कुटुंबीयांचे सांत्वन, कायद्याचा धाक उरलेला नाही

Maharashtra Flood Relief : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीन हजार कोटी, मंत्री मकरंद पाटील; २३ जिल्ह्यांतील ३३ लाख शेतकऱ्यांना मदत

Madhya Pradesh : मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी केले ओरछामध्ये श्रीराम राजा दरबारचे भूमिपूजन; ओरछातील विकासकामांचा घेतला आढावा

SCROLL FOR NEXT