पिंपरी-चिंचवड

कचरा कुंडीमुक्त प्रभागात बकालपणा ! जुनी सांगवी परिसरातील स्थिती, संकलन गाड्या वेळेवर येत नसल्याचा परिणाम

CD

रमेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
जुनी सांगवी, ता. ३ ः जुनी सांगवी परिसरात रस्त्याकडेला टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे ऐन पावसाळ्यात मुळा नदी किनारा परिसराला बकालपणा येत आहे. आरोग्य विभागाकडून सकाळी रस्त्याकडेला पडलेला कचरा दुपारी उचलला जात आहे. नियोजनाचा अभाव व नागरिकांकडून रस्त्याकडेला टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यांचे ढीग येथील मुळा नदी किनारा रस्ता, पवना नदी गणपती विसर्जन घाट, पी.डब्ल्यू.डी. मैदान, पाण्याची टाकी रस्ता याठिकाणी नित्याचेच झाले आहेत. यामुळे ‘हाच का कचरा कुंडीमुक्त प्रभाग’ असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
संकलन गाड्यांची अपुरी व्यवस्था
अपुऱ्या कचरा संकलन गाड्या, नियोजनाचा अभाव यामुळे शंभर टक्के कचरा संकलन होत नसल्याने परिणामी नागरिक घरात तुंबलेला कचरा रस्त्याकडेला भिरकावत असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. कचरा संकलन गाड्यांची संख्या वाढवून वेळेचे नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कचरा संकलन गाड्या वेळेवर येत नसल्याने अनेकदा चाकरमानी मंडळींकडून गाडीत कचरा टाकला जात नाही. परिणामी हा कचरा रस्त्यावर भिरकावला जात आहे.
मुळा नदी किनारा रस्ता हा वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर एक शाळा, उद्यान आहे. पुणे-औंधकडे जाण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. सकाळच्या शाळेला जाणाऱ्या चिमुकल्यांना या रस्त्याकडेला पडलेल्या कचऱ्याचा त्रास सहन करत मार्गक्रमण करावे लागते. अनेकदा टाकलेले शिळे अन्न पदार्थ खाण्यासाठी भटकी कुत्री व मोकाट जनावरांचा विद्यार्थी व पालकांना सामना करावा लागत आहे.
कचरा संकलन व्यवस्थित होत नसल्याने अशा ठिकाणी पुन्हा कचराकुंड्या ठेवण्यात याव्यात, पावसाळ्याचे दिवस असल्याने रोगराई साथीचे आजार पसरू नयेत, याची आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

कोट-
‘‘संकलन करणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी अथवा कचरा संकलन केंद्रात कचरा देण्यासाठी प्रबोधन करावे.
- संतोष कांबळे, माजी नगरसेवक

कोट-
‘‘परिसरात नियमित कचरा संकलन केले जाते. मुळा नदी किनारा भागात कचरा पडू नये, यासाठी यालगतच सुशोभीकरण करण्यात आले आहे. अनेकदा येथे पडणारा कचरा रोखण्यासाठी कर्मचारी उभे करण्यात आले आहेत. यावर उपाययोजना करण्यात येईल.
-दीपक कोटियाना, आरोग्य निरीक्षक, सांगवी विभाग


फोटोः 15871

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

Karad Accident: दुर्दैवी घटना! 'कालेटेकच्या दोघांचा अपघाती मृत्यू'; भरधाव चारचाकीची मोटारसायकला पाठीमागून भीषण धडक..

Asia Cup 2025 : आशिया कपमधून माघार घेतल्यास पाकिस्तान बोर्ड लागणार भिकेला? तब्बल 'इतक्या' दशलक्ष डॉलरचं होईल नुकसान

मोठी बातमी! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील ‘या’ लाभार्थींना आता दरमहा मिळणार २५०० रुपये; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; ऑक्टोबरपासून वाढीव लाभ

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा टेस्टी पनीर कचोरी, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT