पिंपरी-चिंचवड

नदी पात्रात कचरा पेटविला; नागरिकांचा श्वास कोंडला

CD

जुनी सांगवी, ता.३ ः जुनी सांगवी येथील पवना नदीपात्रात टाकण्यात येणारा कचरा गुरूवार (ता.२) सायंकाळच्या सुमारास अज्ञाताकडून पेटविण्यात आल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे, नागरिकांचा श्वास गुदमरला. संपूर्ण सांगवीत धुर पसरल्याने नक्की काय झाले ? कुठे आग लागली ? अशा प्रश्नांनी सांगवीकर भांबावून गेले होते.
सांगवी भागात धूर पसरल्याने रहदारीस अडचण निर्माण झाली होती. अनेकांनी धुर कुठून येतोय याचा शोध घेण्यासाठी धाव घेतली. तेव्हा, नदीपात्रात कचरा पेटविल्याचे निदर्शनास आले. काही सुजाण नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर, दलाच्या जवानांनी ही आग विझविली.
पवना नदीपात्रात काठावर नेहमी कचरा टाकला जातो. तोच कचरा अज्ञाताकडून पेटविला जातो. इतका कचरा इतका साठतो. येतो कुठून ? यात काय गौडबंगाल आहे ? हेतुपुरस्सर हे कुणी करतंय का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कचराकुंडी मुक्त प्रभागाचा फज्जा
रस्त्याकडेला साठणारे कचऱ्याचे ढीग, कचरा संकलनाची कोलमडलेली यंत्रणा यामुळे कचराकुंडी मुक्त प्रभागाचा फज्जा उडाल्याचे चित्र परिसरात पहायला मिळते. एकीकडे ओला-सुका कचरा अलगीकरण करून देण्यात यावा, यासाठी नागरिकांवर होणारी दंडात्मक कारवाई होत असते. याउलट, सांगवी संकलन केंद्रात कचऱ्याचे सर्रास अलगीकरण करण्यात येत नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

हा प्रकार पहिल्यांदाच घडतोय असे नाही. असे प्रकार अनेकदा घडले आहेत. गुरुवारी पेटविण्यात आलेला कचरा साधारण दोन ट्रक इतका होता. यामुळे नदीपात्रही प्रदूषित होत आहे. - विठ्ठल गुरव, नागरिक

इतक्या मोठ्या प्रमाणावर पडणारा कचरा नागरिक टाकत नाहीत. हा रहदारीचा रस्ता आहे. शिवाय नदीकाठावर संरक्षक जाळी आहे. इतका मोठ्या प्रमाणावर कचरा कसा येतो ? हे शोधून कारवाई करावी. - ज्ञानेश्वर बोरकर, रहिवासी

नदीपात्रात नागरिकांकडून कचरा टाकला जातो. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून येथील कचरा नियमित उचलला जातो. नदीपात्रातून दोरीच्या साहाय्याने पोती भरून अनेकदा येथील कचरा संकलन केला आहे. नागरिकांनी कचरा टाकू नये. कचरा गाडीतच कचरा टाकावा. - वैशाली रणपिसे, सहाय्यक आरोग्य निरीक्षक, सांगवी

फोटो ओळ-जुनी सांगवी येथे गुरूवार ता.२ पवना नदी पात्रात टाकण्यात आलेला कचरा पेटविण्यात आल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar industry: साखर कोणी खाईना, खपात घसरण; मार्चचा ५० टक्के कोटा पडून; एप्रिलमध्येही विक्रीचे ‘चॅलेंज’, उद्योगासमोर दुहेरी संकट!

Vidarbha News:शासकीय कार्यालये की मृत्यूचे सापळे? ; ९५ टक्के इमारती धोकादायक; कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ

Vidarbha News: रस्त्यांची दयनीय स्थिती; विकासकामांसाठी प्रतीक्षाच; हलबीटोला मार्गासह मुख्य रस्ते जीर्ण; अपघाताचा धोका वाढला

Amravati News: सेंट्रल बँकेत तीन कोटींचा अपहार; न केलेल्या कामाचे देयके काढून पैसा खिशात

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं! दोन एकर जमिनीसाठी सख्ख्या भावासह वडिलांचा कुऱ्हाड-खोऱ्याने खून; हिंगणगावात विहिरीशेजारी नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT