पिंपरी-चिंचवड

सार्वजनिक वाहतूकीचा महत्त्वाचा दुवा : पीएमपीएमएल

CD

सार्वजनिक वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा : पीएमपीएमएल

कोणतेही कार्य नव्याने हातात घ्यायचे म्हणजे त्याला प्रस्थापितांचा विरोध हा आलाच. तसाच विरोध पुण्यात बससेवा सुरू करताना झाला. यावर आज कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र १९४० मध्ये जेव्हा पुण्यात बस सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तेव्हा त्याला टांगेवाल्यांकडून मोठा विरोध झाला. एवढेच नाही तर या निर्णयाविरोधात टांगेवाल्यांनी संपही पुकारला होता. मात्र; तरीही याचवर्षी खासगी कंपनीमार्फत शहरातील चार मार्गांवर बस सेवा सुरू झाली. पुणे, पिंपरी चिंचवडसह त्यांना जोडणाऱ्या विविध ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा म्हणून ‘पीएमपीएमल’कडे पाहिले जाते. या परिवहन व्यवस्थेचा खासगी बससेवा ते पीएमटी, पीसीएमटी ते पीएमपीएमल असा प्रवास उलगडणारा हा लेख ....

- संजय कोलते, व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल)

टांगेवाल्यांचा विरोध
पुणे शहरामध्ये बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा १९४० मध्ये मांडण्यात आला. त्यावेळी पुण्यामध्ये नगरपालिका अस्तित्वात होती. त्या काळात पुण्यात सार्वजनिक वाहतुकीसाठी टांगा हेच साधन होते. बससेवा सुरू करण्याची बातमी पुढे आल्यानंतर टांगेवाल्यांनी विरोध केला. बससेवा सुरू होऊ नये, या विरोधात टांगेवाले चार दिवस संपावर गेले. मात्र, शासनाने मान्यता दिल्यानंतर २ जून १९४० रोजी पुण्यात चार मार्गावर खासगी बस सेवा सुरू करण्यात आली. सिल्वर ज्युबिली मोटर यांच्याकडून स्वारगेट ते पुणे स्टेशन, स्वारगेट ते शनिवारवाडा, लकडीपूल ते जुना पुलगेट, पुणे स्टेशन ते लकडी पूल अशा चार मार्गावर या बसेस सुरू झाल्या. चार वर्षातच म्हणजेच १९४४ मध्ये ही संख्या ४६ बसेसवर जाऊन पोचली. सुरवातीला १२ बस पासून सुरू झालेली या बससेवेचे जाळे पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे महानगर विकास प्राधिकरण यांच्या हद्दीतील ३९० मार्गांवर पसरले आहे. त्यावेळीच्या ४१ बसेसची जागा आता २११९ बसेसनी घेतली आहे. आज दररोज सुमारे १३ लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. यावेळी बसने प्रवास करण्यासाठी एका मैलासाठी १ आणा (सहा पैसे ) एवढे तिकीट दर आकारले जात होते.

पीएमटीची स्थापना
पुणे नगरपालिकेचे रूंपातर १९५० मध्ये पुणे महापालिकेत झाले. याच दरम्यान सिल्वर ज्युबिली मोटर्सने आपली बससेवा बंद करण्याबाबत सरकारला कळविले. त्यामुळे महापालिका अस्तित्वात आल्यानंतर केवळ १५ दिवसांतच म्हणजेच १ मार्च १९५० मध्ये पुणे महापालिकेने पुणे मनपा वाहन व्यवहार (पीएमटी) या परिवहन उपक्रमाची स्थापना केली व सिल्वर ज्युबिलीकडून सर्व बसेस व बस कर्मचारी पीएमटीमध्ये वर्ग करून घेतले. जुन्या फोर्ड कंपनीच्या २२ बस व डॉज कंपनीच्या नवीन ३५ बस अशा ५७ बस यावेळी पीएमटीच्या ताफ्यात होत्या. ही परिवहन सेवा सुरू करण्यासाठी पुणे महापालिकेने १५ लाखांचे कर्ज घेतले. पीएमटीने नवीन १४ मार्गांवर बससेवा सुरू केली. यावेळी बसचे कमीत कमी भाडे होते ५ पैसे. दहा वर्षातच पीएमटीची बस संख्या १३५ वर जाऊन पोचली. १९५१ पर्यंत बसमध्ये उभा राहून प्रवास करण्यास परवानगी नव्हती. नंतर सरकारने ही परवानगी दिली.

पीएमटीच्या प्रसिद्धीचा काळ
१९६० ते १९८५ हा काळात पीएमटीच्या प्रसिद्धीचा आलेख कायम चढता राहिला. पुणे शहराच्या पश्चिमेला असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराच्या औद्योगिकीकरणाने यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. १९६०नंतर पिंपरी चिंचवड येथे औद्योगिक वसाहत स्थापन झाली. या भागात नोकऱ्या उपलब्ध झाल्या. परिणामी या भागात नोकरीसाठी जा-ये करणाऱ्या कर्मचारी वर्गाची संख्याही वाढू लागली. यावेळी सुरू झालेल्या बजाज ऑटो, टेल्को व अन्य उद्योगांतील कामगारांना प्रवासासाठी पीएमटीने आपली बस सेवा पुरविली. याच काळात १९७४ मध्ये पीएमटीच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेनेही पिंपरी चिंचवड महानगर परिवहन (पीसीएमटी) उपक्रमाची सुरवात केली. ४ मार्च १९७४ रोजी पिंपरी
गाव ते भोसरी या एकमेव मार्गावर ८ बसेसची सेवा पीसीएमटीने सुरू केली. यावेळी पिंपरी येथे केवळ एकच बस डेपो होता. १९८८ पर्यंत पीसीएमटीचाही विस्तार १३ मार्गांवर झाला.

पीएमटी व पीसीएमटीचे विलीनीकरण

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडील अध्यादेशानुसार २००७ मध्ये पीएमटी व पीसीएमटीचे विलीनीकरण करण्यात आले. पीएमपीएमएल कंपनी ॲक्ट खाली १९ जुलै २००७ मध्ये पीएमपीएमएल अर्थात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अस्तित्वात आले. पीएमपीएमएलमध्ये पुणे महापालिकेचा ४० टक्के व पिंपरी चिंचवड महापालिकेचा ६० टक्के वाटा आहे.

‘बीआरटी’मुळे वेगवान प्रवास

शहरे वाढली तशी पिंपरी चिंचवड शहरातून पुण्यात प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. २००० नंतर हिंजवडी येथे आलेल्या आयटी पार्कमुळे शहराचा विस्तार झाला. पुणे व पिंपरी चिंचवड आयटी हब म्हणून नावारूपास आले. शहरातील प्रवाशांचा प्रवास वेगवान व आरामदायी व्हावा यासाठी बीआरटी ही संकल्पना राबविण्यात आली. या संकल्पनेचा पहिला प्रोजेक्ट कात्रज ते हडपसर या मार्गावर सुरू करण्यात आला. बीआरटीच्या निमित्ताने पहिल्यांदा वातानुकूलित बस पुण्यात धावल्या. पिंपरी चिंचवडमध्येही औंध ते रावेत व निगडी ते दापोडी असे बीआरटी मार्ग विकसित झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहराचा वेगाने विकास होऊ लागल्याने सध्या हिंजवडी, माण, देहू, आळंदी, मोशी, चाकण, तळेगाव, लोणावळा या मार्गांवरही पीएमपीची बससेवा सुरू झाली आहे.

पीएमपीएमएलच्या सध्याच्या सुविधा

- बीआरटी ः बीआरटी अर्थात बस रॅपिड ट्रान्झिट सुविधा. या माध्यमातून पीएमपीने नागरिकांना आरामदायक व सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सध्या पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये बीआरटीच्या ८ कॉरिडॉरमधून एकूण ८२८८ खेपा केल्या जात आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक व सीएनजी बसचा पर्यायदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- अटल सेवा ः या सुविधेअंतर्गत पाच रुपयांमध्ये पाच किलोमीटरचा प्रवास अशी सोय करण्यात आली आहे. पाच मिनिटांची वारंवारता असलेली ही सेवा पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील प्रवाशांना लाभदायक आहे.
- महिलांसाठी विशेष बस ः कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी सर्वाधिक गर्दी व घनता असलेल्या १० मार्गावर या बस कार्यरत आहेत.
- युपीआय तिकीट ः नव्याने सुरू करण्यात आलेल्या या सुविधेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, सध्या साडेचार लाखांहून अधिक प्रवाशांनी एक कोटी १ लाख ९७ हजार ९२५ रकमेची तिकिटे घेतली आहेत.

पीएमपीची सद्यःस्थिती

पुणे व पिंपरी चिंचवड शहर व पीएमआरडीएच्या हद्दीत सध्या एकूण ३९० मार्गांवर पीएमपीच्या २११९ बसेस धावत आहेत. या भागांतील १३ लाख प्रवासी दररोज पीएमपी बससेवेचा लाभ घेत आहेत. ज्यातून दरमहा सरासरी ४८ कोटींचे उत्पन्न पीएमपीएमएलला मिळत आहे. ही सेवा पहाटे साडेचार ते रात्री बारा वाजेपर्यंत उपलब्ध असून, सुरक्षित प्रवासासाठी पीएमपी हक्काची वाहतूक व्यवस्था आहे.

भविष्यातील योजना :

- परिवहन मंडळाच्या बस ताफ्यात नवीन बस खरेदी करणे.
-निगडी व चऱ्होली दोन नवीन आगार तयार करणे
- मेट्रो फिडर सेवेतील बसेसची वारंवारता वाढविणे
- मोबाईलच्या माध्यमातून बसचे तिकीट काढता यावे, यासाठी मोबाईल तिकिटाचे ॲप्लिकेशन उपलब्ध करून देणे.
- गूगल ट्रेकिंग व गूगल मॅपच्या माध्यमातून बसस्थानकांची माहिती, ट्रॅफिकची माहिती, बसच्या वेळा, दिशा-निर्देश, इच्छित स्थळी जाण्यासाठी विविध मार्ग यांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- ‘व्हाटस् अप टिकीटिंग’ सेवेच्या माध्यमातून प्रवाशांच्या ‘व्हाटस अप’ या ॲपवर संदेशाद्वारे तिकीट काढण्याची सोपी माहिती भविष्यात उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- एनसीएमसी कार्ड म्हणजेच ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ हे एक स्मार्ट कार्ड असून, बसच्या प्रवासाचे भाडे रोख रकमेच्या स्वरूपात न देता या कार्ड रीडरवर स्कॅन करून, मल्टी मोडल कनेक्टिव्हीटीद्वारे भरता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : चार सामने अन् Orange Cap साठी ७ दावेदार! विराटचा शेवटचा क्रमांक, Vaibhav Sooryavanshi पण आहे पुढे, टॉपर कोण?

डोळ्यात संताप अन् लेकरासाठीची तगमग; प्रार्थना बेहेरेच्या 'मर्दिनी'चा टीझर प्रदर्शित; दिसणार अभिनेत्रीचा दमदार अंदाज

कला, नृत्य आणि विज्ञानाचा संगम... मुंबईत ओपन सायन्स पार्क साकारतंय! विज्ञान शिकणं होणार आणखी रंजक

Mhada Lottery: काही दिवस बाकी! म्हाडाच्या २,६४० घरांची लॉटरी, लगेचच करा अर्ज; कुठे आणि कसा? जाणून घ्या...

Nautapa 2026: नवतापा म्हणजे काय? वर्षातील सर्वात गरम दिवसांमागचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT