पिंपरी, ता. ३ ः ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या व सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणातील विविध रचना, या रचनांवर नृत्यांगणांनी केलेले भरतनाट्यमचे अप्रतिम सादरीकरण, नृत्यातून उलगडलेले रामायणातील विविध प्रसंग याचा अनुभव शहरातील रसिकांनी घेतला. निमित्त होते गदिमा व्यासपीठ आणि सौदामिनी प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गीतरामायण भरतनाट्यम नृत्यानुभव या कार्यक्रमाचे. या वेळी आठ नृत्यांगनांनी रामायणातील विविध पात्रे भरतनाट्यम नृत्य शैलीच्या माध्यमातून जिवंत करीत केलेल्या सादरीकरणास रसिकांनी टाळ्यांची दाद दिली. निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे आयोजित केलेल्या गीतरामायण भरतनाट्यम् नृत्य यांचा अनोखा संगम रसिकांनी अनुभवला.
आनंद माडगूळकर, जितेंद्र पेठकर, कुमुदिनी पेठकर, अविनाश मोरे, अनुप मोरे, तेजस्विनी कदम, राजेश गाडगीळ, माजी नगरसेविका गीता आफळे, हर्षदा माडगूळकर, कल्पना बालाजी, अमिता गोडबोले, नृत्य दिग्दर्शिका सौदामिनी राव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्योती ब्रह्मे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.