पिंपरी-चिंचवड

बुक बॅंक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप

CD

जुनी सांगवी, ता. १६ ः नृसिंह हायस्कूल शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसर बुक बॅंक उपक्रमांतर्गत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सांगवी परिसरात सामाजिक कार्यकर्त्या आदिती निकम व सहकाऱ्यांच्या वतीने बुक बॅंक उपक्रम चालविण्यात येते. शैक्षणिक वर्ष संपलेल्या विद्यार्थी व पालकांना पुस्तके संकलनाचे आवाहन करून अशी पुस्तकं संकलित करून ती गरजू विद्यार्थ्यांना भेट दिली जातात.

गत दोन वर्षांपासून या उपक्रमास परिसरातील नागरिक व विद्यार्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुटीच्या काळात सर्व वयोगटातील परिक्षा देऊन पुढील वर्गात गेल्याला विद्यार्थ्यांकडून पुस्तकांचे संकलन करण्यात येते. आदिती निकम व सहकारी मिळून स्वखर्चातून काही पुस्तकं संचांची भर घालून, ही पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना दिली जातात. नृसिंह हायस्कूल येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य अशोक सकपाळ, शिक्षक शरद ढोरे, प्रदीप पाटील, क्षितिज कदम, स्वानंद तळेकर, नवनाथ करंजुले, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रमिला जाधव, नामदेव तळपे आदी उपस्थित होते.

‘‘पुस्तके मिळाल्याचा आनंद आहे. मिळालेल्या पुस्तकांमधून अभ्यास करून चांगले यश मिळवीन.’’
- कीर्ती बासुतकर, विद्यार्थिनी

‘‘गेल्या दोन वर्षांपासून आम्ही हा उपक्रम परिसरात राबवत आहोत. शहरात उदरनिर्वाह करण्यासाठी विविध भागातून कुटुंब आलेली असतात. अनेकांकडे आर्थिक अडचणी असल्यामुळे असे पालक पाल्यांना पुस्तके घेऊन देऊ शकत नाहीत. अशा गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देणे हा आमचा उद्देश आहे. या उपक्रमात अनेक जणांचे सहकार्य आहे.
- आदिती निकम, सामाजिक कार्यकर्त्या, बुक बॅंक उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar : कर्नाटकातील १२ आमदारांची दोन लग्ने; खुद्द मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे यादी, बंगळूरला स्थायिक झाल्याची माहीती

Maharashtra Drought Fodder Camp : चारा छावणीसाठी शासनाचे नियम काय? किती अनुदान मिळते; जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे अधिकार

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील जोशीची खास पोस्ट; सुरू केलाय खास व्यवसाय; म्हणतो- जितकी मेहनत या ब्रॅण्डसाठी घेतेयस...

ना ढोल-ताशे, ना गर्दी... एकट्या भक्ताचा स्वतः घडवलेला बाप्पाला भावूक निरोप; डोळे पाणावणारा Video Viral

Latest Marathi News Live Update : कोयना धरणातून ३,९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT