पिंपरी-चिंचवड

दापोडी, सांगवी परिसरात तुंबतेय पाणी घरांमधून पाणी शिरल्याने रहिवाशांची तारांबळ, पावसाळापूर्व उपाययोजनांवर फुली

CD

जुनी सांगवी, ता. ७ ः जुनी सांगवी, दापोडीत सखल भागात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या प्रकारांमुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. दापोडीत जयभीम नगर, गावठाण, आत्तार वीट भट्टी हा कष्टकरी रहिवाशांचा चाळी वस्तीचा परिसर आहे‌. परिसरात पावसाळापूर्व स्वच्छता व उपाययोजना झाल्या नसल्याचे चित्र आहे.
जुनी सांगवी येथील ममतानगर, मुख्य रस्ता वास्तुशांती रेसेडन्सी येथे पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांना कसरत करत घर गाठावे लागत आहे. अंतर्गत गल्ल्यांमधून हीच परिस्थिती असल्याने मुख्य रस्त्यासह नागरिकांना गल्ल्यांमधून तुंबणाऱ्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. स्थापत्य विभाग, आरोग्य विभाग, जल निस्सारण विभागाकडून संयुक्त दुरुस्ती कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले.

‘‘दापोडी परिसरात जयभीम नगर, आत्तार वीट भट्टी परिसरात नेहमी पाणी तुंबते. त्यामुळे रहिवाशांच्या घरात पाणी येत असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, याबाबत आम्ही वारंवार मागणी केलेली आहे.’’
-प्रकाश गोयर, रहिवासी.

‘‘गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांना पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे.
-अशोक अडसूळ, सतीश पटेकर, रहिवासी.

‘‘येथील परिस्थितीबाबत कार्यवाही सुरू आहे. दुरुस्ती कामे व उपाययोजना करण्यात येतील.
-यशवंत डांगे, मुख्य आरोग्य अधिकारी, महापालिका.

‘‘सांगवी भागात पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून दुरुस्ती व उपाययोजना करण्यात येत आहेत.
-प्रकाश कोटकर, अभियंता, स्थापत्य विभाग, ह प्रभाग


फोटो ः 18022, 18023

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT