पिंपरी-चिंचवड

वाइल्ड लाइफ फोटोग्राफी आव्हानात्मक

CD

पिंपरी, ता.९ : ‘‘वाइल्ड लाइफ फोटोग्राफीमध्ये कमाविण्यासारखे काहीच नाही; तर ही छायाचित्रे काढताना खूप काही गमवावे लागते. मात्र, जो क्षण येतो तो अचूक टिपणे हे सगळ्यात महत्त्वाचे आणि आव्हानात्मक असते. परंतु, यातील सगळे अनुभव रोमांचक असतात. वाइल्ड लाइफ फोटोग्राफीच्या क्षेत्राकडे वळण्यापूर्वी आपल्याकडे कमाईचा एक स्त्रोत असणे गरजेचे आहे.’’, असे मत आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार बैजू पाटील यांनी व्यक्त केले.
प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे देवदत्त फोटोग्राफी स्कूलच्यावतीने आयोजित मुलाखतीत बैजू पाटील यांनी छायाचित्रे काढताना अनुभवलेले थरारक प्रसंग, किस्से कथन केले. छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड, डॉ. संजय सिंग, प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत बैजू पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पाटील यांनी काढलेल्या पुरस्कारप्राप्त छायाचित्रांचा स्लाइड शो याप्रसंगी दाखविण्यात आला.
पाटील म्हणाले,‘‘ आपण सगळे निसर्गाचं काहीतरी देणं लागतो. वन्यजीव छायाचित्रकार हे निसर्गावर काम करत असतात. निसर्गाचे अस्तित्व टिकून ठेवण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन जर वाइल्ड लाइफ फोटोग्राफी केली; तर निसर्ग तुम्हाला काहीच देणार नाही. मात्र, जर पॅशन म्हणून केली; तर नक्कीच आपण नक्कीच चांगले काम करू शकतो.’’
देशातील रणथंबोर अभयारण्य, जिम कॉर्बेट अभयारण्य, भरतपूर पक्षी अभयारण्य, ताडोबा अशा विविध ठिकाणी काढलेल्या छायाचित्रांविषयी त्यांनी माहिती दिली. यावेळी आलेले अनुभवही त्यांनी कथन केले. त्यासोबत वाइल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी कोणत्या लेन्सेस असाव्यात ?, किती वेळ द्यावा ?, प्राण्यांसोबत वेळ कसा घालवावा ? याची इत्यंभूत माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT