पिंपरी-चिंचवड

तडे गेलेल्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू नवी सांगवी फाटा ते घोलप कॉर्नर दरम्यान रस्त्याच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह सकाळ बातमीचा परिणाम

CD

जुनी सांगवी, ता. १० ः नवी सांगवी फाटा ते घोलप कॉर्नर दरम्यान नुकत्याच झालेल्या सिमेंट रस्त्याला तडे गेल्याने येथील कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करताच त्याची दखल घेऊन दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाली आहे.
गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचे चार टप्प्यांत सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम करण्यात आले. मुख्य रस्ता असल्याने सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांना रहदारीसाठी कसरत करावी लागली होती. काम पूर्ण होऊन रस्ता खुला केल्यानंतर एका महिन्यातच रस्त्याला तडे जाणे, पदपथ खचल्याने रस्ता विकासकामे करताना ती वेळेत व दर्जेदार करावीत, अशी नागरिकांची मागणी होती. पाचशे मीटर रस्त्यासाठी सुमारे आठ कोटी २५ लाख रुपये इतका खर्च करण्यात आलेला आहे. यात पावसाळी जलवाहिन्या, सेवा वाहिन्या, पदपथ, रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण अशा गोष्टींचा समावेश होता‌. मार्च २०२४ ही कामाची मुदत होती. सिमेंट कॉंक्रिटीकरण काम पूर्ण झाल्यानंतर पदपथ व इतर किरकोळ कामे सुरू ठेवून, हा रस्ता मार्चनंतर रहदारीसाठी खुला करण्यात आला. मात्र, ठिक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्याने पुन्हा दुबार या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. याबाबत ‘सकाळ’मधून १७ मे रोजी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

दुरुस्ती कामामुळे एकेरी वाहतूक
दुरुस्ती कामामुळे या रस्त्यावर एकेरी वाहतूक करण्यात आल्याने जुनी सांगवी व परिसरातील नागरिकांना जिल्हा रुग्णालय रस्ता कामगार वसाहत मार्गे, फेमस चौक, साई चौक असा वळसा घालून यावे लागत आहे. ऐन पावसाळ्यात एकेरी वाहतुकीमुळे नागरिकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

‘‘विकासकामे नागरिकांच्या हिताचीच असतात. मात्र, ती गुणवत्तापूर्ण व वेळेत होणे गरजेचे असते. आधीच एक वर्ष नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. काही शाळा सुरू झाल्या आहेत. काही शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. दुरुस्ती कामे लवकर उरकून रस्ता खुला करावा.
- एक पालक

‘‘येथील तडे गेलेल्या ठिकाणी कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. पदपथाचे काम सुरू आहे. येत्या आठ दिवसांत येथील काम पूर्ण होईल.
जयकुमार गुजर, अभियंता, स्थापत्य विभाग


फोटोः 18043

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT