पिंपरी-चिंचवड

सांगवीत विद्यार्थ्यांची आरोग्य वारी

CD

जुनी सांगवी, ता. ११ ः नवी सांगवी येथील जनता शिक्षण संस्थेच्या ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल व गुरूनानक हायस्कूल शाळेतील विद्यार्थ्यांकडून आरोग्य वारीचे आयोजन करण्यात आले.

आजच्या धावपळीच्या युगात नागरिकांसह विद्यार्थ्यांमध्ये विविध आजार बळावत आहेत. निरोगी शरीर ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली मानली जाते. त्यानुसार समाजात आरोग्य जनजागृती होण्याच्या उद्देशाने आरोग्य वारीचे नियोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका नंदा काकडे व प्रीती चव्हाण यांच्या हस्ते ग्रंथदिंडीची पूजा करून करण्यात आली. साई चौक, कृष्णा चौक, क्रांती चौक, फेमस चौक मार्गे विठ्ठल, माउलीच्या गजरासह निरोगी आरोग्याचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा देत वारी मार्गस्थ झाली. टाळ मृदुंगाच्या गजरासह विद्यार्थ्यांकडून लेझीम पथकाद्वारे जनजागृतीपर संदेश देण्यात आला. यात विविध घोषणापत्र विद्यार्थ्यांकडून बनविण्यात आली होती. महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाकडून सहभाग घेत प्लास्टिक मुक्त परिसर अभियान राबविण्यात आले. यावेळी ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झीटे, मुख्य आरोग्य निरीक्षक सतीश पाटील, आरोग्य निरीक्षक सचिन जाधव, बेसिक्स टीमचे झोनल इन्चार्ज विनोद कांबळे, धीरज फणसे, सुनील धावारे उपस्थित होते. स्वच्छ सर्वेक्षण २०२४ माहिती सांगून प्लास्टिक जनजागृती करण्यात आली.
पाच प्रकारचा कचरा प्लॅस्टिकचे होणारे दुष्परिणाम याबाबत रॅलीच्या माध्यमातून माहिती सांगण्यात आली. नियोजन शीतल भुजबळ, दीपाली शहाणे, प्राजक्ता येवले, शामली खैरे यांनी केले. प्रियांका लोमटे व सागर झगडे यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT