पिंपरी-चिंचवड

जुन्या गृहप्रकल्पांच्या पुनर्विकासाला मान्यता द्या

CD

पिंपरी, ता. २७ : तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने १९७२ ते २०२१ या कालावधीत सुमारे ३२ गृहप्रकल्प योजना राबविल्या आहेत. त्यापैकी बऱ्याच योजनांना ४० वर्षे झाल्याने या योजनेतील घरे कमकुवत झाली आहेत. त्यामुळे, अशा गृहप्रकल्प योजनांच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पांना मान्यता द्यावी, अशी मागणी वृक्ष प्राधिकरणाचे माजी सदस्य आणि ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश वाडकर यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे केली. 
पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांना त्याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे. वाडकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, शासनाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या जमीन विल्हेवाट विनियम २०२३ ला मान्यता दिली आहे. त्यामध्ये गृहप्रकल्प योजनांचे पुनर्विकास प्रस्ताव हे मान्यतेसाठी विकास प्राधिकरण समितीकडे सादर करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. तत्कालीन प्राधिकरणाचे ३२ गृहप्रकल्प योजनांसाठी पिंपरी चिंचवड महापालिका ही नियोजन प्राधिकरण आहे. त्यामुळे, योजनांना युनिफाईड डेव्हलपमेंट व प्रोमोशन रेग्युलेशन २०२० लागू आहेत. या कायद्यांमध्ये दुप्पट एफएसआय वाढवून देण्याची तरतूद आहे.
गृहप्रकल्प योजनांमधील कुटुंबातील व्यक्तींची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे, पुनर्विकास योजनेत या कुटुंबांना क्षेत्र वाढवून मिळणार आहे. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास देखील नवीन सदनिका मोफत मिळणार असून प्राधिकरणाला आर्थिक लाभ होणार आहे. याचा विचार करून गृहप्रकल्प योजना पुनर्विकासासाठी आपणाकडे प्रस्ताव सादर करतील, त्यांचे प्रस्ताव तातडीने विकास प्राधिकरण समितीकडे मान्यतेसाठी सादर करावेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT