पिंपरी-चिंचवड

संविधान भवन उभारणीसाठी १२० कोटी रुपयांची निविदा

CD

पिंपरी, ता. ५ : देशाच्या राज्यघटनेचा प्रचार, प्रसार आणि जनजागृतीसाठी महापालिका शहरात संविधान भवन उभारणार आहे. त्यासाठी सुमारे १२० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून चिखली प्राधिकरण पेठ क्रमांक ११ मध्ये संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमआरडीएकडून संबंधित जागा महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्याची ई-निविदा दोन कोटी ५३ लाख २५ हजार ४०७ आणि दुसऱ्या टप्प्यातील सुमारे ११७ कोटी अशी एकूण ११९ कोटी ७१ लाख ३५ हजार ३२६ रुपयांची निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. याबाबत आमदार लांडगे म्हणाले, ‘‘नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संविधान भवन उभारणीसाठी पाठपुरावा सुरू केला. प्राधिकरणाकडून महापालिकेकडे जागा हस्तांतरित झाली आहे. आता संविधान भवन उभारणीसाठी निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरीत होवून शहरात संविधान तथा राज्य घटनेचा प्रचार, प्रसार व्हावा. यासह जगभरातील लोकशाही देशाच्या घटनांचा अभ्यास करता यावा, असा संकल्प आहे. संविधान जागृती आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी उभारण्याच्या कामाला गती द्यावी, अशी सूचना महापालिका प्रशासनाला केली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: पहिल्यांदा IPS, पण स्वप्न IASचं! किराणा दुकानदाराच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात कसं मिळवलं यश?

Maharashtra Budget 2026 : बळिराजा लाडका! दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ, बहिणींना ओवाळणी कायम

Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Maharashtra Heatwave Alert : राज्यात सूर्याचा प्रकोप! अमरावतीने ओलांडली चाळीशी; पुढील 24 तास तुमच्यासाठी का आहेत महत्त्वाचे?

SCROLL FOR NEXT