पिंपरी, ता. ९ : ‘‘पुरस्कार मिळाल्यामुळे आता सर्वांची जबाबदारी वाढली असून पुढील काळातही आपल्याकडून असेच उत्कृष्ट काम होईल, यात कोणतीही शंका नाही. येत्या काळात राज्य शासनाकडून माध्यमिक शाळांच्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न केला जाईल,’’ अशी ग्वाही पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी दिली.
भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष नंदकुमार सागर यांनी प्रास्ताविक केले. पुणे शहर सचिव शिवाजी कामठे यांनी सूत्रसंचालन केले. तर जिल्हा सचिव प्रसाद गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी विश्वस्त हनुमंत कुबडे, शिवाजी किलकिले, अरुण थोरात, आदिनाथ थोरात, कुंडलिक मेमाणे, हरिश्चंद्र गायकवाड, मधुकर नाईक, पुणे विभागीय अध्यक्ष रामराव पाडुळे, राज्य प्रतिनिधी तबाजी वागदरे, सुधाकर जगदाळे, उपाध्यक्ष सुरेश कांचन, राजेश गायकवाड, रामदास थिटे, विठ्ठल चिकणे, विद्या समिती सचिव भानुदास रिठे, सहसचिव कल्याण बर्डे आदी उपस्थित होते. नियोजन पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संभाजी पडवळ, सचिव सुबोध गलांडे, सुजित जगताप, सचिव शिवाजी कामठे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.