पिंपरी-चिंचवड

कासारवाडी भुयारी मार्गाच्या रस्त्याचे काम प्रगतिपथावर

CD

जुनी सांगवी, ता. ७ ः कासारवाडी शंकरवाडी शंकर मंदिर रस्ता आणि भुयारी मार्ग रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम गतीने सुरु आहे. एकूण चार टप्प्यांत रस्ते सिमेंट कॉंक्रीटीकरण काम होणार आहे. भाविकांना दत्तजयंतीसाठी अडथळा होवू नये यासाठी स्थापत्य विभागाकडून दत्त मंदिर परिसरातील एका टप्प्याचे काम गतीने पूर्ण करण्यात आले आहे. दत्तमंदिर आश्रमाच्या कार्यक्रमांसाठी स्वच्छता आणि सुशोभीकरण करून परिसर सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे स्थापत्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

कासारवाडी शंकर मंदिर ते पिंपळे गुरव पुलापर्यंत रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करून नूतनीकरण करण्यात येत असल्याने रहदारी सुकर होण्यास मदत होणार आहे. जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपरी भोसरीकडे ये-जा करण्यासाठी मुख्य रस्त्याऐवेजी जवळचा मार्ग म्हणून गेली अनेक वर्षापासून नागरिक रहदारीसाठी या रस्त्याचा उपयोग करतात. भुयारी मार्ग व रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास येथील अडथळे दूर होऊन रहदारी सुकर होणार आहे.

कामाचे स्वरूप
शंकरवाडी शंकर मंदिर ते पिंपळे गुरव सृष्टी चौक पुलापर्यंत हा रस्ता जोडला जात आहे. साधारण तेवीस कोटी ३९ लक्ष ९७ हजार रुपये या कामाचा खर्च असून कामाची मुदत नोव्हेंबर २०२५ पर्यंत आहे. काही ठिकाणी बारा मीटर व अठरा मीटर असे रस्त्याचे दोन टप्प्यात काम करण्यात आले आहे. बारा मीटर रस्त्याचे एकूण अंतर ७०० मीटर असून, अठरा मीटर रस्त्याचे एकूण अंतर ८६० मीटर आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूस तीनशे ते चारशे मीटर व्यासाच्या सेवा वाहिन्या पावसाळी पाणी वाहिन्या, जलनिस्सारण वाहिन्या, ड्रेनेज लाईन टाकण्यात आले आहेत. शंकरवाडी अंडरपास पर्यंतचा तीनशे मीटर लांबीचा रस्ता उजव्या बाजूस पूर्ण झाला आहे. तर, डाव्या बाजूची किरकोळ कामे दुसऱ्या टप्प्यात सुरू आहेत. रस्त्याच्या डाव्या बाजूला सायकल ट्रॅक, ग्रीनरी पदपथ करण्यात येत आहेत. एचसी कटारिया व गणेश कन्स्ट्रक्शन हे या रस्त्याचे काम करत आहेत. या रस्त्यामुळे परिसराच्या वैभवात भर पडून रहदारी सुकर होणार आहे.

‘‘दत्तजयंतीनिमित्त या परिसरात मोठ्या संख्येने भाविक येतात. रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण झाल्याने या परिसराचे रूप बदलेले आहे.’
- अरुण शिंदे भाविक.

‘‘मंदिर परिसर शंभर मीटरच्या परिसरात दीपमाळ प्रकाश व्यवस्था, ग्रीनरी करण्यात येत आहे. दत्त मंदिर परिसरातील एका टप्प्याचे काम पूर्ण करून येत्या महिन्याभरात पुढील काम पूर्ण करण्यात येणार आहे. वाहनासाठी उजव्या बाजूने पर्यायी रस्ता वळविण्यात आला आहे. ’’
- सुनील दांगडे, उप अभियंता स्थापत्य ‘ह’ प्रभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड होणार! २००० रुपये खात्यात जमा, २२वा हप्ता देत पंतप्रधानांचे मोठं वक्तव्य

बिग बॉस नंतर आयुष संजीवची नवी इनींग ! 'या' गाण्याचं केलं दिग्दर्शन आणि कोरियोग्राफी

Fridge Vastu Tips: फ्रिजच्यावर 'या' 3 गोष्टी ठेवू नका, अन्यथा निर्माण होतात वास्तुदोष

Latest Marathi News Live Update : परळीच्या धारावती तांड्यावर 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना

Akola News: बहिणीच्या विरहात भावाचा जीव गेला; अंत्यसंस्कारानंतरच हृदयविकाराचा झटका

SCROLL FOR NEXT