पिंपरी-चिंचवड

नव्याने दोन न्यायालयांची मोरवाडीत होणार स्थापना

CD

पिंपरी, ता. ७ ः पिंपरीतील मोरवाडी येथे नव्याने दोन न्यायालय स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी (ता. ६) प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. के. महाजन तसेच, पिंपरी न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश एम. जी. मोरे यांनी मोरवाडी येथील जुन्या न्यायालयाची पाहणी केली.

मोरवाडी येथे ५ न्यायालय फर्निचर सहित तयार असून या ठिकाणी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन व्हावे, यासाठी पिंपरी-चिंचवडमधील वकिलांनी वारंवार मागणी केली होती. दरम्यान, या न्यायालयांच्या प्रस्तावास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिली, असून हा प्रस्ताव निधी अभावी शासन स्तरावर प्रलंबित आहे. परंतु, या प्रक्रियेला वेळ लागणार असल्यामुळे तोपर्यंत इतर दोन न्यायालये पिंपरी मोरवाडी येथे सुरू करण्यासाठी न्यायाधीशांनी जुन्या न्यायालयाची पाहणी केली. यावेळी आकुर्डी येथील महापालिकेचे सुरू असलेले दिवाणी न्यायालय मोरवाडी येथे स्थलांतरित करावे, जेणेकरून वकिलांना व पक्षकारांना दोन्ही न्यायालय जवळ असल्यास सोयीचे होईल, अशी मागणी महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतिश लांडगे यांनी केली.

यावेळी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष संजय दातीर पाटील, ॲड. दिनकर बारणे, ॲड. गोरक्ष लोखंडे (महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग- सदस्य), ॲड. श्रीराम गालफाडे, ॲड. नीलेश भिसडे, ॲड. चौरे, ॲड. प्रसन्न लोखंडे, टायपिस्ट संघटनेचे शुभम मचाले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विम्याच्या पैशांसाठी अपघाती मृत्यूचा बनाव, मृतदेहाशिवाय शवविच्छेदन अहवाल अन् FIR; पत्नीसह डॉक्टर आणि ४ पोलिसांना अटक

Latest Marathi News Live Update : एलपीजी (LPG) गॅसच्या तुटवड्याचा हॉटेल व्यवसायावर परिणाम

BCCI Rewards T20 WC Champions: वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघाला १३१ कोटींचं बक्षीस; सूर्याची टीम झाली मालामाल

SEBI on Stock Market: अस्थिर जागतिक स्थितीमुळे घाबरु नका, शांत रहा, सेबी प्रमुखांचा गुंतवणूकदारांना सल्ला

Sahyadri Tiger: ‘सह्याद्री’तील वाघांवर कॅमेरे, ड्रोनद्वारे नजर; वन विभागाकडून दर अर्ध्या तासाला अपडेट, कर्मचाऱ्यांची आठ पथके तैनात!

SCROLL FOR NEXT