पिंपरी-चिंचवड

नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिस प्रशासन जागे बावधन येथील उद्योजकाच्या पार्टीचे प्रकरण

CD

पिंपरी, ता. ११ : बावधनमधील कोकाटे वस्ती येथे रात्री दहानंतर मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक लावून ध्वनी प्रदूषण करण्याची घटना रविवारी (ता. ८) घडली होती. नागरिकांच्या तक्रारी आणि पाठपुराव्यानंतरच पोलिसांनी अखेर गुन्हा नोंदवला.
एरवी किरकोळ कारणांवरून सर्वसामान्यांना वेठीस धरणारे पोलिस प्रशासन बड्या उद्योजकांबाबत नरमाईची भूमिका घेत असल्याचे चित्र बावधनमधील कोकाटे वस्ती येथे दिसले. वेंकिज कंपनीचे संचालक बालाजी राव यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लावलेल्या साउंडच्या भिंतींमुळे परिसरात ध्वनी प्रदूषण झाले. मोठ्या आवाजामुळे परिसरातील रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
या पार्टीची जागा असलेले मैदान म्हणजे राखीव वनक्षेत्र आहे. अनेक वन्य जिवांचा अधिवास तेथे आहे. या परिसरातच ‘एनडीए’ आहे. असे असतानाही येथे पार्टी कशी होऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तोपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. नागरिकांनी पाठपुरावा केल्यानंतरच पोलिस प्रशासनाला दखल घेणे भाग पडले. त्यामुळे आयोजक वेंकीज कंपनीचे सरव्यवस्थापक आदिनाथ संभाजी मते (रा. वेंकटेश्वरा हाऊस, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

‘‘बावधन येथील पार्टी प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाचा भाग म्हणून आठ जणांना नोटीस बजावली आहे. येथून पुढे अशा घटना होणार नाहीत, यासाठी खबरदारी घेऊ.

- अनिल विभूते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बावधन पोलिस ठाणे
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Solapur News: साेलापूरातील ‘त्या’ सात ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई; मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम घेणार निर्णय!

Global Oil Shortage Reasons : सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! ऊर्जासंस्था देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे 'आयईए'चा प्लॅन?

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT