जुनी सांगवी, ता. १३ ः बालयोगी नंदकुमार महाराज स्थापित दत्त आश्रमात दत्तनाम सप्ताह व संगीत महोत्सवाच्या सहाव्या दिवशी पद्मभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित दिलीप काळे यांचे बहारदार संतूर वादन झाले. कश्मिरी खोऱ्यातील जगप्रसिद्ध संतूर वादन सादरीकरण ऐकण्याकरिता श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. त्यांनी मध्यलय रूपकातील अनोख्या व स्वतंत्र बंदिस्त केलेल्या लयकारी सादर केल्या. ज्याला श्रोत्यांच्या प्रचंड टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. अध्या आलातील संतूर वादनातील त्यांचे नैपुण्य व लयकारी गुरूंचे आठवण देणारी होती. तबला सात विख्यात तबलावादक पंडित अरविंद चटर्जी यांचे शिष्य समीर सूर्यवंशी यांनी केली.
प्रथम सत्रांमध्ये संगीता मर्डूर यांचे गायन झाले. त्यांनी विलंबित एकताल पुरिया कल्याण रागातील बंदिश सादर केली. सुंदर तोरे रूप ही द्रुत बंदिशला श्रोत्यांची उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दत्तगुरू दत्तगुरू सुमरो रे’ हे सोहनी रागातील झप तालातील रचना टाळ्यांची दाद मिळवून गेली. त्यांना तबला साथ स्वप्नील दीक्षित हार्मोनिअम साथ उमेश पुरोहित यांनी केली.
सहाव्या दिवसाची सांगता छत्रपती संभाजीनगरचे सचिन नेवपूरकर यांच्या गायनाने झाली. त्यांना तबला साथ वेदांग ठोंबरे, हार्मोनिअम उमेश पुरोहित, तानपुरा प्राचीक खोते व ऋषिकेश कमलाकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गजानन महाराज वाव्हळ यांनी केले. आभार तुकाराम भाऊ महाराज यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.