पिंपरी-चिंचवड

सांगवीत शुक्रवारपासून कलाश्री संगीत महोत्सव

CD

जुनी सांगवी, ता. ७ ः जुनी सांगवी येथील कलाश्री संगीत मंडळातर्फे आयोजित कलाश्री संगीत महोत्सव येत्या १० ते १२ जानेवारी दरम्यान नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे होणार आहे. गायन, वादन व नृत्य अशी संपूर्णपणे कलेची अनुभूती देणाऱ्या या महोत्सवात रसिकांना सांगितिक मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे.

किराणा घराण्याचे गायक स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या हस्ते महोत्सवाची सुरुवात झाली. यंदा महोत्सवाचे २७ वे वर्ष आहे. येत्या १० जानेवारीला आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्‍घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर उषा ढोरे होते. अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार तानाजी सावंत, जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अविनाश सुर्वे, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रिद्धी पोतदार यांचे भरतनाट्यम, पंडित अतुल खांडेकर यांचे गायन, ईशान घोष यांचे तबला वादन होईल. दुसऱ्या दिवशी युवा गायक विराज जोशी यांचे गायन, पंडित हिमांशू नंदा यांचे बासरी वादन आणि गायत्री जोशी यांचे गायन होईल. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पंडित समीर सूर्यवंशी व शिष्य यांचे वादन, शाश्वती चव्हाण यांचे गायन होईल. पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होईल. महोत्सवात हार्मोनिअमवर पंडित सुयोग कुंडलकर, अविनाश दिघे, माधव मारणे, गंगाधर शिंदे, अभिषेक शिनकर, लीलाधर चक्रदेव, अमेय बिचू साथ करतील. तसेच, तबल्यावर पंडित भरत कामत, प्रशांत पांडव, पांडुरंग पवार, अजिंक्य जोशी, किशोर कोरडे, पखवाजवर गंभीर महाराज साथ करतील, अशी माहिती सच्चिदानंद कुलकर्णी, समीर महाजन, प्रणाली विचारे, नंदकिशोर ढोरे, आदित्य जगताप यांनी दिली.

कलाश्री संगीत मंडळातर्फे देण्यात येणारा ‘कलाश्री पुरस्कार’ लोकनेते माजी आमदार स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ पंडित गिरीश संजगिरी यांना माजी आमदार अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तसेच, यावर्षीचा स्व. शंकुतला नारायण ढोरे यांच्या स्मरणार्थ ‘कलाश्री युवा पुरस्कार’ प्रसिद्ध सतार वादक पंडित मोशीन खान यांना प्रदान करण्यात येणार आहे. असे कलाश्री संगीत मंडळाचे पंडित सुधाकर चव्हाण यांनी सांगितले.

कलाश्री संगीत मंडळ लोगो वापरावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT