पिंपरी-चिंचवड

माझ्या पुरस्कारामुळे अनेकांना पोटदुखी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता एकनाथ शिंदे यांचा टोला

CD

पिंपरी, ता. १६ ः ‘‘आम्ही घरात बसून राजकारण करत नाही. मैदानात उतरून संघर्ष करावा लागतो, तेव्हा यश मिळते. पुरस्काराने माझा नुकताच सन्मान झाला. म्हणून अनेकांना पोटदुखी झाली आहे. तीन वर्षे झालीत तरीही त्यांची पोटदुखी थांबत नाही,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता टोला लगावला.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी लिहिलेल्या संघर्षयोद्धा पुस्तकाचे प्रकाशन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंदगिरी महाराज आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी झाले. त्यावेळी शिंदे बोलत होते.
केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार विजय शिवतारे, सुनील शेळके, महेंद्र थोरवे, राहुल कूल, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ‘‘काहीजण उठसूट माझ्यावर टीका करत सुटले आहेत. एकवेळ माझ्यावर टीका केली तरी चालेल, पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर देखील ते टीका करतात. मागील लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह सेट केले. तरी मतदारांनी आम्हाला बहुमताने निवडून दिले. भल्याभल्यांना मावळचा गड भेदता आला नाही. आम्हाला अस्मान दाखवण्याची भाषा करणारे आता जमिनीवर आलेत.’’
आम्ही खुर्चीसाठी नाही तर लोकांसाठी राजकारण करतो. सत्ता येते, जाते. पदं वर- खाली होत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री असताना मी स्वतःला ‘कॉमन मॅन’ समजत होतो. आज ‘डीसीएम’ असलो तरी ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ असे समजतो. ‘लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ’ ही माझी सर्वात मोठी ओळख आहे. सरकारने सुरू केलेली एकही योजना बंद केली जाणार नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.
स्वामी गोविंदगिरी महाराज म्हणाले, ‘‘धर्माचं पहिले प्रकाशन म्हणजे श्रीराम आणि दुसरी आवृत्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ‘शिवाजी महाराजांकडे गड, किल्ले आहेत, त्याचे मला मोल नाही, पण त्यासोबतच त्यांच्याकडे न झुकणारे, न विकणारे मावळे आहेत’, असे औरंगजेब म्हणायचा, म्हणून मावळचे महत्त्व अधोरेखित होते. असे न विकले जाणारे कार्यकर्ते पाठीशी असल्यामुळे बारणे खासदार आहेत, असेही ते म्हणाले.
मोहोळ यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीरंग बारणे सोशल फाउंडेशनने संयोजन केले.
-----------


फोटोः 19282

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT