पिंपरी-चिंचवड

गड-किल्ल्यांवरील प्रदर्शन, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके

CD

जुनी सांगवी, ता.१९ ः जुनी सांगवी, दापोडी परिसरात विविध उपक्रम व मिरवणुकांनी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याशिवाय मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, गड-किल्ल्यांच्या माहितीचे सचित्र प्रदर्शनसारखे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले.
जुनी सांगवीतील मधुबन मित्र मंडळाच्यावतीने गड किल्ल्यांच्या माहितीचे सचित्र फलकाद्वारे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले. मधुबन मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुहिक शिववंदना, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे सदस्य संजय देशमुख, तुकाराम हाडोळे, सुभाष भोळे, सुभाष जाधव, अविनाश गायकवाड आदींनी संयोजन केले. शिवाई ढोरे, सार्थक हाडोळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर कविता व भाषण सादर केले.
आनंदनगर येथे शिवराय प्रतिष्ठानच्यावतीने दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी इत्यादी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच सामूहिक शिववंदना व महाआरती करण्यात आली. अखिल दापोडी समस्त गावकरी मंडळ यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यानिमित्त स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माजी महापौर उषा ढोरे, माजी नगरसेवक अशोक सोनवणे, माजी नगरसेवक संतोष कांबळे यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली. यावेळी हिरेन सोनवणे, कृष्णा भंडलकर, वैभव ढोरे, मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना सोनवणे यासह शिक्षक - पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT