जुनी सांगवी, ता.२५ ः भारतीय बौद्ध जन विकास समिती व अग्रसेन ट्रस्टच्यावतीने आयोजित संविधान जनजागृती विषयावरील निबंध स्पर्धेच्या शालेय गटात पिंपळे सौदागरमधील अण्णासाहेब मगर विद्यालयातील स्नेहल खुणे हिने तर
महाविद्यालयीन विद्यार्थी गटामध्ये रामकृष्ण महाविद्यालयाच्या सानिका नायकवडी हिने विजेतेपद पटकाविले.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड व पुणे परिसरातील शाळा, विद्यालयांमधून संविधान जनजागृती या विषयावर वरील स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवराज कनजे होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, अग्रसेन महाराज सेवा ट्रस्टचे सुनील अग्रवाल, वही पेन संकलन समितीचे सदस्य सन्मान समितीच्या सदस्या आशा बैसाणे आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये एकूण ५५ शाळा व महाविद्यालयांतील एक हजार आठशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शालेय गटात कीर्ती विद्यालयाच्या रोहिणी पुजारी हिने द्वितीय तर शिफा आत्तार हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. महाविद्यालयीन गटात पीसीसीओईच्या मयुरी निंबाळकर हिने द्वितीय तर सोनू पवारने तृतीय क्रमांक मिळवला. राम गायकवाड यांनी यावेळी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात संविधान जनजागृती या विषयावर प्रा. राजाभाऊ भैलुमे यांनी संविधान, समता, बंधुता, सार्वभौम व आर्थिक न्याय याविषयी मार्गदर्शन केले. रमेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संजय उबाळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद जाधव, शैलेंद्र बैसाणे, नवनाथ सोरटे, रामदास इंगळे यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.