पिंपरी-चिंचवड

पवना नदी प्रदूषणाबाबत आज मुंबईत बैठक

CD

(पवनेला फास वृत्तमालिका आणि सकाळ इम्पॅक्ट लोगो वापरावा)

पिंपरी, ता. २५ : पवना नदी प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी (ता. २६) मुंबईत बैठक आयोजित केली आहे. त्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या समक्ष बैठक होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासह हिंजवडी आयटी पार्क, पुण्यातील वाघोली, एमआयडीसी यांसह मावळ तालुक्यातील बहुतांश गावांच्या पाणीपुरवठा योजना पवना नदीवर आहेत. मात्र, घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे ती अतिप्रदूषित झाली आहे. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण शून्य झाले आहे. याबाबत ‘सकाळ’च्या पिंपरी-चिंचवड आवृत्तीने सोमवारपासून (१७ मार्च) ‘पवनेला फास’ ही दहा भागांची वृत्तमालिका प्रसिद्ध केली. नदी प्रदूषण का वाढत आहे, तिला मिळणाऱ्या नाल्यांची स्थिती काय आहे, पाण्यातील ऑक्सिजनसह रासायनिक घटकांचे प्रमाण किती आहे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा कशी आहे? औद्योगिक सांडपाणी कुठून, किती व कसे मिसळते? नदी प्रदूषण कमी करण्यासाठी काय करायला हवे? पर्यावरणप्रेमींचे काय म्हणणे आहे? महापालिकेसह प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करत आहे आणि काय करायला हवे? अशा अनेक मुद्द्यांचा उहापोह ‘पवनेला फास’ या मालिकेच्या माध्यमातून मांडला. नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना सुचविल्या. या मालिकेची दखल घेऊन सरकारच्या पर्यावरण विभागाने बुधवारी मुंबईत पर्यावरण विभाग सचिवांकडे बैठक आयोजित केली आहे. त्या बैठकीस उपस्थित राहण्याचे पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाठविले आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या समक्ष बैठक होणार असल्यामुळे त्यात काय निर्णय होतो?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Economic Crisis: पाकिस्तान व फिलिपिन्समध्ये चार दिवसांचा आठवडा; दरवाढीमुळे आपत्कालीन उपाययोजना, इंधन वाचविण्याचा प्रयत्न!

Sarpanch Bribe Case : गरीब ग्रामस्थाची झोपडी दुरुस्त करण्यासाठी सरपंचाने 15 हजारांची मागितली लाच, 'असा' अडकला जाळ्यात!

Kalamb Municipal Council Tightens Rules Against Garbage Dumping: कळंबमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर; नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा

Iran Missile Attack: सततच्या हल्ल्यांमुळे तणाव कायम; इराणकडून आखाती देशांवर क्षेपणास्त्र हल्ले, शस्त्रसंधी नाहीच!

Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेची आयबी शाळा बंद करण्याचा निर्णय वादात

SCROLL FOR NEXT