पिंपरी-चिंचवड

ईएसआय रुग्णालयात होणार महात्मा फुले योजनेची अंमलबजावणी

CD

पिंपरी, ता. ४ : राज्य शासनाच्या धोरणानुसार आता मोहननगर, चिंचवड येथील राज्य कामगार विमा रुग्णालयात (ईएसआय) महात्मा फुले जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेतील पात्र रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. या अगोदर फक्त ईएसआय कामगारांवर उपचार करण्यात येत होते. आता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनाच्या माध्यमातून इतर रुग्णांवरही उपचार करण्यासाठी रुग्णालय प्रशासन सज्ज झाले आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरातील नागरिकांना ते सोयीचे ठरणार आहे. योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी चिंचवड येथील ईएसआय रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त महाराष्ट्रातील बारा राज्य कामगार विमा रुग्णालय (ईएसआय) येथे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात येणार आहे. त्याचे उद्‍घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सोमवारी (ता. ७) ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यादृष्टीने मोहननगर, पिंपरी चिंचवड येथे असणाऱ्या ईएसआय रुग्णालयामध्ये पूर्ण तयारी करण्यात आली आहे. या विमा संरक्षणमध्ये प्रति कुटुंब वार्षिक दीड लाख रुपये पर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण प्रदान केले जाते. या योजनेत ३४ विशेषतांमध्ये १ हजार ३५६ आरोग्य लाभ समाविष्ट आहेत. ज्यामध्ये विविध शस्त्रक्रिया, थेरपी आणि उपचारांचा समावेश आहे. फॉलोअप उपचारामध्ये २६२ फॉलोअप उपचार सुविधा उपलब्ध आहेत.

‘‘मोहननगर येथील ईएसआय रुग्णालयात फक्त कामगारांसह त्यांच्या कुटुंबावर उपचार केले जात होते. आता राज्यातील १२ ईएसआय रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू होणार आहे. या रुग्णालयात कामगारांशिवाय इतर रुग्णांवरही उपचार करण्यात येणार आहेत. तरी या योजनेत पात्र असणाऱ्यांनी सोमवारी (ता. ७) मोहननगर येथील ईएसआय रुग्णालयात उपस्थित राहावे.
- डॉ. वर्षा सुपे, वैद्यकीय अधिक्षक, कामगार रुग्णालय, मोहननगर चिंचवड
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

Mumbai Missing link Project: मिसिंग लिंकच्या बोगद्याखाली गुप्त बोगदा, आव्हानात्मक काम झालं सोपं; भविष्यातही बनणार संकटमोचक!

माफी नंतरही वाद शमेना! धीरेंद्र शास्त्रींची शिवभक्त असल्याचं दाखवण्याची धडपड, शिवरायांचे चित्र असलेला सदरा केला परिधान

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात वीजनिर्मिती प्रकल्पातील दोन संच पडले बंद

Shivaji University Hostel food issue : शिवाजी विद्यापीठ वसतिगृहातील जेवणात अळ्या, किडे; शिवसेना आक्रमक, वारंवार घटनेने विद्यार्थ्यांची हेळसांड

SCROLL FOR NEXT