पिंपरी-चिंचवड

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विजेता महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विजेता

CD

जुनी सांगवी, ता.१५ ः हलगीचा कडकडाट, ताशाचा गजर.. शिट्टया, टाळ्यांसह शाब्बास रे पठ्ठया..अशा कुस्ती शौकीन प्रेक्षकांच्या उत्साहाच्या प्रतिसादात पिंपळे निलखचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज गावजत्रेची कुस्ती आखाड्याने सांगता झाली. त्यामध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने मुख्य लढत जिंकत चांदीची गदा पटकाविली.
पिंपळे निलखमध्ये सोमवारी (ता.१४) कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले. पंचक्रोशीतील कुस्ती शौकिनांनी कुस्त्या पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि हरियाणाचा मल्ल तेजल कुमार यांच्यात पहिल्या क्रमांकाची मुख्य लढत झाली. त्यामध्ये सिकंदर याने हरियाणा केसरी तेजल कुमारचा गुणांवर पराभव करत बाजी मारली.
याचबरोबर अनिकेत मांगडे वि.वि. प्रशांत शिंदे, रोहित मोडळे वि.वि. अविनाश गावडे, अविनाश शिंदे वि.वि. अमित गायकवाड, आकाश सातव वि.वि. संग्राम सूर्यवंशी वि.वि. कुणाल कस्पटे वि.वि. उद्धव कुलथे, प्रसाद गायकवाड वि.वि. आनंद थोरात, सचिन गायकवाड वि.वि. सनी जाधव, विश्वजीत कोंडे वि.वि. विनीत कटके अशा लढती झाल्या. महिलांमध्ये स्वरा महेश कामठे हिने श्रावणी माने हिच्यावर मात केली. ही कुस्ती प्रेक्षणीय ठरली. उपस्थितांनी या कुस्तीला टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. यावेळी माजी नगरसेवक तुषार कामठे, काँग्रेसचे आसाम प्रभारी पृथ्वीराज साठे, शिरीष साठे, सचिन साठे, नितीन इंगवले, प्रकाश बालवडकर, रवी काळे आदी उपस्थित होते. आखाडा पंच म्हणून गुलाब धरपळे, दिलीप इंगवले, हरिभाऊ साठे, गुलाब इंगवले, महेश इंगवले, जितीन इंगवले, संदीप इंगवले, बंडू गोसावी, श्रीहरी तरंगे, हेमंत शितोळे आदींनी काम पाहिले.
तत्पूर्वी श्री भैरवनाथ महाराज गावजत्रेनिमित्त पिंपळे निलखमध्ये आठवडाभरापासून अखंड हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात राज्यातील नामवंत कीर्तनकारांनी कीर्तन सेवा केली. महाप्रसाद व पगंतीचे आयोजन करण्यात आले. उत्सवात शनिवार (ता.१२) पहाटे भैरवनाथ महाराज अभिषेक, सकाळी भजन, हनुमान जन्मोत्सव, सायंकाळी सात वाजता बगाड मिरवणूक झाली होती. रात्री नऊनंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. रविवार (ता.१३) सायंकाळी सात वाजता गौतमी पाटील प्रस्तुत धमाकेदार लावण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले‌.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli BJP vs Congress politics : सांगली जिल्ह्यात भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसचा गणिमी कावा; मिरजमध्ये भाजपला दूर ठेवण्यासाठी सर्वच एकवटले

Shivam Dube: साधेपणा pro-max! वर्ल्डकप जिंकून देणारा शिवम दुबे चक्क रेल्वेने घरी, नेटकऱ्यांनी केला सलाम

Latest Marathi News Live Update : विधानभवनाबाहेर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Chandoli Forest Leopard Sighting : सांगलीच्या चांदोलीत वाघांनंतर आता 'या' दुर्मिळ पाहुण्याची एन्ट्री; सफारीदरम्यान पर्यटकांना मिळालं खास सरप्राईज!

SSC Exam Paper Leak : दहावीचा गणिताचा पेपर तीन दिवस आधीच फुटला, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका व्हायरल, बोर्डाच्या सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिह्न

SCROLL FOR NEXT