पिंपरी-चिंचवड

मुळा नदीचे पात्र हॅरिस पुलापर्यंत हिरवेगार

CD

जुनी सांगवी, ता.२७ ः पावसामुळे वाहून आलेल्या जलपर्णीमुळे जुनी सांगवी परिसरातील मुळा नदीपात्र पिंपळे निलख हद्दीपासून दापोडीपर्यंत भरले आहे. त्याने नदीपात्र जणू हिरव्यागार शेतीसारखे भासू लागले आहे. मात्र त्याने जुनी सांगवी, दापोडी आणि पिंपळे निलख परिसराला डासांचा उपद्रवाला सामोरे जावे लागणार आहे.
वर्षभर जलपर्णी काढण्याचे काम केले जात असल्याचा दावा महापालिकेकडून केला जातो. मात्र, जलपर्णी काढण्याच्या नावाखाली ठेकेदार पोसण्याचे काम होत असल्याचा आरोप सांगवीकर करत आहेत. सध्या मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी दिसून येत आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जलपर्णी आली कुठून ? पावसाळ्यात जलपर्णी पात्राबाहेर काढण्यात येणार का ? की मोठ्या पावसाने जलपर्णी पुढे वाहून जाण्याची महापालिकेचा पर्यावरण विभाग वाट पाहात बसणार ? असे प्रश्न नागरिकांमधून विचारले जात आहेत.
मधुबन सोसायटी, शितोळेनगर, ढोरेनगर, मुळानगर, अभिनवनगर, जयमालानगर, पवनानगर, संगमनगर, ममतानगर या नदीकाठच्या रहिवासी भागांसह समस्त जुनी सांगवी, दापोडीकरांना हा नेहमीचा त्रास आहे. जुनी सांगवी ते दापोडीचा हॅरिस पूल परिसरात साधारण चार ते किलोमीटरपर्यंत नदीपात्र जलपर्णीमुळे व्यापले आहे.

जलपर्णी साचून राहिल्यास जुनी सांगवीकरांना डास व किटकांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागणार आहे. सध्या कोरोनासारखा आजार डोके वर काढत असताना त्यात डासांमुळे होणारे आजार उद्भवू शकतात. त्याची दखल घेऊन पर्यावरण विभागाने याकडे लक्ष द्यावे.
- रुपेश पुजारी, नागरिक

पुणे महापालिका व पर्यावरण विभाग संयुक्तपणे उपाययोजना करून कार्यवाही करेल. वर्षभर नदीपात्र स्वच्छ ठेवण्याचे काम सुरू होते. पावसामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर जलपर्णी वाहून आली आहे. योग्य उपाययोजना करण्यात येतील.
- संजय कुलकर्णी, अभियंता, पर्यावरण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

राज्य शालेय पोषण आहाराची परदेशात तस्करी? सीआयडीमार्फत चौकशीची मागणी, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT