जुनी सांगवी, ता.११ ः पिंपळे निलख परिसरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला असून झुंडीने वावर आणि भुंकत मागे धावण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळ - संध्याकाळ चालायला बाहेर पडणारे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वारांच्या मागे भुंकत पाठलाग केल्याने अपघाताच्या घटना घडल्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पिंपळे निलख गावठाण, विशालनगर, क्रांतीनंतर, पंचशीलनगर, स्मशानभूमी रस्ता चिकन मटणाची दुकाने प्रमुख बाजारपेठ येथे भटक्या श्वानांचा मोठा वावर वाढला आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रारी करूनही यावर उपाय योजना केल्या नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या श्वानांवर नियंत्रण मिळवण्यासाठी धोरणात्मक कारवाई करावी, त्यांचे नियमित लसीकरण व निर्जंतुकीकरण करावे, मोकाट जनावरांसाठी सुरक्षित निवारा केंद्रात स्थलांतर करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
नागरिक मनोज अगरवाल म्हणाले,‘‘पिंपळे निलख भागांत भटक्या श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हे श्वान भुंकत पाठलाग करतात. अनेकवेळा त्यामुळे अपघात झाले आहेत. महापालिकेने त्यांना निवारा केंद्रात स्थलांतर करावे.’’
महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी अरुगण दगडे म्हणाले,‘‘भटक्या श्वानांच्या समस्येवर तत्काळ पाहणी करून उपाय योजना करण्यात येईल. या भागात श्वानांचे लसीकरण करण्यात येईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.