पिंपरी-चिंचवड

भाष्य हिंजवडी

CD

भाष्य
---------------------------
‘आयटी’ची ‘ऐट’ टिकावी
- पीतांबर लोहार

राज्यातील सर्वात मोठे आयटी हब म्हणजे हिंजवडी आयटी पार्क. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरालगतचा भाग. साधारण २५ वर्षांपूर्वी आयटी पार्क उभारण्यासाठी हिंजवडीसह माण व मारुंजीतील जमिनी संपादित केल्या. त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या भूमिपुत्रांवर गोळीबारही झाला होता. पण, आपल्या भागाच्या विकासासाठी आंदोलकांनी नमती भूमिका घेत जमिनी दिल्या आणि टप्पा एक, दोन, तीन अशा प्रकारे आयटी पार्क उभे राहिले. आज सुमारे दीड लाख आयटीयन्स येथे कामाला येतात. काहींनी कंपनी घराजवळ असावी म्हणून स्वप्नातील घरही घेतले. आयटी पार्क परिसरात सुमारे एक लाख कुटुंब राहतात. पण, आता त्यांच्यावर आणि त्यांच्या कंपनी व्यवस्थापनावर पश्चात्तापाची वेळ आली आहे. कारण, हिंजवडी ‘आयटी’ नव्हे पावसाळ्यातील ‘वॉटर पार्क’ झाले आहे. काही ठिकाणी ‘डंपिंग ग्राउंड’ झाले आहे. परिसरातील प्रत्येक रस्ता ‘खड्ड्यात’ गेला आहे. त्यातून मार्ग काढताना प्रत्येकाची ‘कोंडी’ होत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी आयटीयन्सचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गुरुवारी (१० मार्च) मुंबईला आले होते. त्यात काही महिलांचाही समावेश होता. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊन कामावर जायला उशीर होतो, त्यामुळे आम्हाला ''वर्क फ्रॉम होम'' मिळावे, अशी त्यांची मागणी होती. रस्ते आणि विजेची समस्या त्वरित न सोडविल्यास हिंजवडीतील आयटी कंपन्या बाहेर जातील, अशी भीतीही अनेकांनी व्यक्त केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येथून पुढे हिंजवडीतील समस्या सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त दर आठवड्याला आढावा बैठक घेतील. डिसेंबरअखेरपर्यंत मेट्रो सेवा सुरू होईल, टप्प्याटप्प्याने कामे मार्गी लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या वर्षा अखेरपर्यंत हिंजवडीची काही प्रमाणात समस्यांपासून सुटका होईल, असे दिसते. मात्र, कायम स्वरुपी उपाययोजना करण्यासाठी पीएमआरडीए, एमआयडीसी, ग्रामपंचायती, जिल्हा प्रशासन, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यात समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारायला हवी. या सुविधा युद्धपातळीवर पुरवणे आवश्यक आहे. अन्यथा आयटी कंपन्या इतरत्र किंवा अन्य राज्यात स्थलांतरित होऊ शकतात. तसे झाल्यास आर्थिक व रोजगाराच्या अडचणीत वाढ होईल. या प्रश्नाकडे राज्य सरकारसह स्थानिक लोक प्रतिनिधींनीही गांभीर्याने पाहणे आवश्यक असून ‘आयटी’ची ‘ऐट’ वाढवायला हवी.

रस्त्यांवरती सारा ‘खेळ’
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून हिंजवडीत जाण्यासाठी तीन रस्ते आहेत. यातील वाकडमधील भुमकर चौक आणि भुजबळ चौक रस्ते महत्त्वाचे आहेत. सर्वाधिक वर्दळ या रस्त्यांवर असते. बालेवाडी-म्हाळुंगे मार्गे रस्त्याचे काम व अन्य रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन रखडले आहे. त्यासह प्रस्तावित रस्त्यांची निर्मिती आवश्यक आहे. पुण्यातील मुठा नदीप्रमाणे पिंपळे निलख, वाकड, हिंजवडी, म्हाळुंगे, बाणेर, बालेवाडी भागात मुळा नदीकिनारी दोन्ही बाजूस रस्त्याची निर्मिती करणे आवश्यक आहे. शिवाय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे प्रस्तावित देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग (मुंबई-बंगळूर) एलिव्हेटेड (उन्नत) करणे आवश्यक आहे. अन्यथा आयटीचा सारा ‘खेळ’ खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही.
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Halwai Ganpati : पुण्यात 'दगडूशेठ गणपती'च्या दर्शनासाठी अभूतपूर्व गर्दी, रात्री २ वाजताचे दृश्य पाहून उडेल झोप, पाहा VIDEO

Team India Fitness Test: गिल, सिराजसह रोहित शर्माचीही फिटनेस टेस्ट; विराटची चाचणी कधी?

Gokul Dudh Sangh Inquiry : गोकुळ दूध संघाच्या चौकशीवर कार्यकारी संचालकांची प्रतिक्रिया म्हणाले...

Nagpur News:'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरातच नवे परीक्षा भवन'; राज्य सरकारला प्रस्ताव सादर

OBC Federation Aggressive:'ओबीसी महासंघ आक्रमक, साखळी उपोषण सुरू'; अन्यथा मुंबईत धडकणार, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध

SCROLL FOR NEXT