पिंपरी-चिंचवड

उद्योगनगरी की ‘खड्डेनगरी’

CD

अविनाश ढगे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १२ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) क्षेत्रातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवरील डांबराचा वरचा थर निघून गेल्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. परिणामी, दुचाकीस्वारांना वाहन चालवणे अवघड जिकिरीचे झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिकनगरी म्हणून ओळख आहे. शहरालगत भोसरी आणि चाकण येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) क्षेत्र विकसित झाले आहे. या परिसरामध्ये आठ हजारांहून अधिक प्लॉटधारक असून, बहुउद्देशीय कंपन्यांना सुटे भाग पुरविणारे पाच हजारांहून अधिक लघुउद्योग आहेत. या भागातील आणि तळेगाव, रांजणगाव, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमधील एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये कच्चा आणि पक्का माल वाहतूक करणारी हजारो वाहने दररोज ये-जा करतात. तसेच एमआयडीसीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ने-आण करणाऱ्या बसची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे.

खड्ड्यांमुळे कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या समस्या
एमआयडीसीतील डांबरी रस्त्यांवरील वरचा थर निघून गेल्यामुळे रस्ते खाली-वर झाले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून दुचाकी चालविणे कठीण झाले आहे. दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती करावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

प्रशासनाची टोलवाटोलवी
एमआयडीसीत पावसामुळे खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली आहे. भोसरी आणि चिंचवड एमआयडीसी परिसरात विविध सुविधा देण्याची जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिकेची असल्याचे एमआयडीसी प्रशासनाचे म्हणणे आहे. पण, महापालिका प्रशासनाकडूनही रस्त्यांची देखभाल दुरुस्ती होत नाही. दोन्ही प्रशासनांनी रस्ते दुरुस्तीवरून एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न होत आहे.

प्रस्ताव धूळखात पडून
चाकण एमआयडीसीतील काही रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा प्रस्ताव मुंबई कार्यालयाला पाठविला आहे. चाकण एमआयडीसी प्रशासनाने प्रस्ताव नोव्हेंबर २०२४ मध्ये पाठविला आहे. पण गेल्या आठ महिन्यांपासून हा प्रस्ताव धूळ खात पडून आहे.

कोंडीचा परिणाम
- एमआयडीसीतील रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे वाहनचालक, कर्मचारी आणि उद्योजक त्रस्त
- पावसामुळे खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरक्षः चाळण
- वाहतूक संथगतीने सुरू
- सकाळी आठ ते दहा आणि सायंकाळी पाच ते आठ या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी
- एमआयडीसीत काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना आणि या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना करावा लागतोय सामना
- वाहतूक कोंडी झाल्यास एक ते दोन किलोमीटरसाठी तासनतास अडकून पडावे लागते

हे रस्ते खराब
- लांडेवस्ती ते इंद्रायणी नगर
- इंद्रायणी नगर ते स्पाइन रोड
- केएसबी चौक ते एमआयडीसी कार्यालय
- आयुक्त बंगला ते सायन्स पार्क
- महाळुंगे पोलिस ठाणे चौक ते इंडोरन्स चौक
- एचपी चौक ते इंडोरन्स चौक

पाऊस सुरू असल्याने आम्ही खडी आणि मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. पाऊस उघडल्यानंतर डांबर टाकणार
आहे.
- प्रकाश भडंगे, कार्यकारी अभियंता, चाकण एमआयडीसी

रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ते गेलेले आहेत. लवकरात लवकर युद्ध पातळीवर रस्त्याचे रुंदीकरण, नवीन पूल व आहे त्या रस्त्यांची कायमची पक्की डागडुजी ही व्हायला पाहिजे.
- संजय सातव, उद्योजक, भोसरी

मी चिंचवडवरुन चाकण एमआयडीसीत कामाला जातो. चाकण एमआयडीसीतील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. महिंद्रा कंपनीजवळ गेल्या एक ते दीड वर्षापासून काम सुरू आहे. पण, अजूनही नाही झालेले त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
- नीलेश सावंत, नागरिक

माझा पिंपरी एमआयडीसीमध्ये लघुउद्योग आहे. मात्र, दररोज वर्कशॉपमध्ये जाताना खड्ड्यांमधून कसरत करीत जावे लागते. महापालिका या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. या खड्ड्यांमधून उद्योजकांना कधी सुटका मिळणार?
- अरविंद सुतार, उद्योजक, पिंपरी एमआयडीसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT