
Siddhivinayak Rathotsav Tasgaon: गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तासगावातील रथोत्सवाला एक ऐतिहासिक परंपरा आहे. एक दोन नव्हे तर तब्बल २४४ वर्ष येथे गणेशाचा रथोत्सव सोहळा पार पडत आहे. तासवागालीत उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाच्या दरवर्षी रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होता.
तासगावातील या मंदिरात उजव्या सोंडेचा गणपती बाप्पा विराजमान आहे. या प्रसिध्द गणेश मंदिरापासून रथोत्सवाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो. श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांच्या हस्ते पूजन होऊन रथोत्सवाला सुरूवात होते.