पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

बोलत नाही म्‍हणून तरुणाने
महिलेची दुचाकी, मोबाईल पळविला
पिंपरी : आपल्‍याशी बोलत नाही म्‍हणून एका तरुणाने महिलेची दुचाकी आणि तिच्या हातातील मोबाईल जबरदस्‍तीने पळवून नेला. पिंपळे सौदागरमधील पेट्रोल पंपाजवळ हा प्रकार घडला. याबाबत एका महिलेने सांगवी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. सचिन भीमराव नागरगोजे (वय ३०, रा. नखातेवस्‍ती, रहाटणी) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे. नागरगोजे आणि महिलेची आधी मैत्री होती. ती कामावर जाताना नागरगोजेने तिला अडवून, तू माझ्याशी का बोलत नाहीस, दुसऱ्याशी का बोलतेस’ असे विचारून तिच्या हातातील १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि एक लाख पाच हजार रुपये किमतीची दुचाकी पळवून नेली.
---
भांडणे सोडवायला गेलेल्या
महिलेवर टोळक्याचा हल्ला
पिंपरी : दुकानासमोर सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेवर टोळक्याने लोखंडी पाइपने हल्ला केला. पिंपरीतील शगुन चौकात हा प्रकार घडला. जखमी महिलेने पिंपरी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी इरफान आरिफ शेख (वय १८, रा. रमाबाई नगर, पिंपरी), जयेश संजय घोंगडे (वय १८), दोन अल्‍पवयीन मुले आणि त्‍यांच्या तीन साथीदारांवर गुन्‍हा दाखल केला. फिर्यादी महिलेच्‍या दुकानासमोर एका पुरुष आणि महिलेची भांडणे सुरू होती. ती सोडवण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीवरून आलेल्‍या आरोपींनी महिलेसह दुकानातील दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.
---
कंपनीतील वादातून
कामगाराला मारहाण
पिंपरी : महाळुंगे एमआयडीसीमध्ये किरकोळ वादातून एका कामगारावर टेपर स्केलने हल्ला करण्यात आला. महेश राजू चौगले (वय २०, रा. दत्त मंदिर शेजारी, निगडी) असे जखमीचे नाव आहे. त्‍यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. त्यावरून दीपक पवार (वय २१, रा. चाकण) याच्यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला. आरोपीने कंपनीतील वादाचा राग धरून महेशच्‍या छातीवर टेपर स्केलने मारले.
---
दारू विक्री प्रकरणी
एका महिलेवर गुन्‍हा
पिंपरी : बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी दारू साठविलेल्या महिलेवर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला. माणमधील लेबर कॅम्‍प परिसरातील पॉवर हाऊस चाळीतील ३५ वर्षीय महिला दारू विक्री करीत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार छापा टाकून पोलिसांनी सात हजार ४०० रुपये किमतीची ७४ लिटर दारू जप्त केली, मात्र पोलिसांची चाहूल लागताच महिला पळून गेली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP vs Chhawa: सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत राडा! राष्ट्रवादी आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जबर हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

Mumbai Best Bus: बसच्या संख्येत घट, प्रवाशांची गैरसोय; मुंबईकरांची खाजगी बससाठी मागणी

Video Viral: तरुणाचा उद्दामपणा! इस्कॉन रेस्टॉरंटमध्ये चिकन खाल्लं, भक्त संतप्त... व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले!

Gatari Amavasya: गटारी अमावस्येच खरं नाव काय? अर्थ आणि यंदाची तारीख जाणून घ्या एका क्लिकवर!

WTC Final पुढील सहा वर्षात तरी भारतात होणार नाहीच! ICC ने तीन फायनलसाठी जाहीर केले ठिकाण

SCROLL FOR NEXT