पिंपरी-चिंचवड

मोबाईलच्या आहारी न जाण्यासाठी ‘संवादवारी’

CD

जुनी सांगवी, ता. २५ ः ‘सकाळ’चे तनिष्का व्यासपीठ आणि संवाद प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईलचा अतिवापर टाळावा यासाठी सांगवीत ‘संवादवारी’चे आयोजन करण्यात आले.
जुनी सांगवी येथील नृसिंह प्रशालेत हा उपक्रम झाला. यात नवी सांगवी, पिंपळे गुरव, जुनी सांगवी येथील तनिष्का गटप्रमुखांनी विद्यार्थी तसेच पालकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या मोहजालातून बाहेर पडून वास्तव संवाद जोडणे किती महत्त्वाचे आहे याबद्दल या विशेष कार्यक्रमात जनजागृती करण्यात आली.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, गेम, सोशल मीडिया याच्या अतिवापरामुळे मुलांमधील संवादकौशल्य, एकाग्रता आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव कमी होत आहेत. या पार्श्वभूमीवर मोबाईल वापरण्याची शिस्त, त्याचे दुष्परिणाम आणि प्रत्यक्ष संवादाचे महत्त्व यावर प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले. मोबाईलचा अतिरेकी वापर कसा टाळावा, गेम्स व लाईक्सच्या आभासी जगातून प्रत्यक्ष नातेसंबंध जपण्याची गरज किती आहे याबद्दल उदाहरणांसह प्रबोधन करण्यात आले. जीवघेण्या सेल्फी, रिल्स यातून बाहेर पडण्याचा मुद्दाही अधोरेखित करण्यात आला.
गेम्स, गप्पा आणि संवादात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात उपस्थित विद्यार्थ्यांनी ‘सोशल मीडियात अडकून न राहता प्रत्यक्ष संवादाला महत्त्व देऊ’ अशी शपथ घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
नृसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक, तनिष्का गटप्रमुख कोमलताई गौंडाडकर, संवाद प्रतिष्ठानतर्फे ॲड. प्रणिता कुलकर्णी, संगीताताई चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी तनिष्का दीपाली आचरेकर, संजीवनी सुरवसे आदी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य अशोक संकपाळ, शिक्षक नवनाथ करंजुले, नामदेव तळपे, कैलास उदावंत तसेच तनिष्का दिपाली आचरेकर, संजीवनी सुरवसे आदी उपस्थित होते.
---
संवाद प्रतिष्ठानचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या अतिवापरापासून दूर ठेवण्यास हातभार लावेल. त्यांच्यात संवाद, विचार आणि सामाजिक जाणीव वाढवण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरत आहे. हा उपक्रम तनिष्का व्यासपीठ व्यापक स्वरूपात पुढे नेण्याचा कटिबद्ध आहे.
- कोमलताई गौंडाडकर, गटप्रमुख, तनिष्का व्यासपीठ
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

Latest Maharashtra News Updates: उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात सकाळी 7 वाजल्यापासून 35000 विसर्ग

Pune Traffic : गणेशोत्सवाच्या तयारीसोबत खरेदीची गर्दी; पुण्याच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT