पिंपरी-चिंचवड

जवानांसाठी पाठविल्या दोन हजार राख्या

CD

जुनी सांगवी, ता. २९ : शाळकरी विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांसाठी तयार केलेल्या दोन हजार राख्या नुकत्याचा पाठविण्यात आल्या. कारगिल विजय दिनी १५ मराठा लाइफ इन्फन्ट्रीच्या अधिकाऱ्यांकडे या राख्या सुपुर्द करण्यात आल्या. औंध कॅम्पचे सुभेदार किरण लोंढे यांनी या राख्यांचा स्वीकार केला.
छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कै.सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, शिशुविहार व नूतन माध्यमिक विद्यालय, सांगवी यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तुळशीराम नवले हे होते. यावेळी सुभेदार किरण लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रम प्रसंगी हवालदार तुषार जगताप, सेना मेडल विजेते शिवाजी भुसारे, शिपाई साळुंखे, शाळेचे खजिनदार रामभाऊ खोडदे, सदस्य प्रकाश ढोरे, जयप्रकाश जंगले यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी माने यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय जगताप यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus: एसटीला फायदा! डिझेल इंधनावरील सवलतीत वाढ; कधीपासून होणार लागू?

Mumbai: 'सीटबेल्ट लावा अन् गाडी चालवा'; वाहतूक पोलिसांनी जोडप्याला फटकारले, नंतर १५ मिनीटांतच जे घडले त्याने सर्वच हादरले

Lal Kitab Remedies : पैसे टिकत नाहीत, काम असफल होतात ? रविवारी करा लाल किताबमधील हे उपाय, प्रत्येक समस्या होईल दूर

समुद्रात उंच लाटा...इमारतीही जमीनदोस्त! जपानमधील त्सुनामीचे फोटो बघून अनेकांना झाली १५ वर्षांपूर्वीच्या 'त्या' घटनेची आठवण...

Shravan Fast Recipes: चातुर्मासासाठी खास चविष्ट, पौष्टिक आणि उपासाला परफेक्ट रेसिपीज, लगेच नोट करा

SCROLL FOR NEXT