पिंपरी-चिंचवड

कचऱ्याचे दैनंदिन व्यवस्थापनच ‘कचऱ्यात’

CD

जुनी सांगवी, ता.३ ः जुनी सांगवी परिसरात अपुऱ्या कचरा संकलन वाहनांमुळे कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न झाला आहे. कचरा संकलन वेळेवर न केल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. या ढिगाऱ्यांमुळे दुर्गंधी पसरुन अस्वच्छतेचे वातावरण तयार झाले आहे. कचऱ्याभोवती भटक्या श्वानांचा वावर वाढला असून रोगराई पसरण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
जुनी सांगवीतील मुळा नदी किनारा रस्ता, पवना घाट परिसर, दत्त आश्रम रस्ता, ममतानगर, रहिवासी वसाहतींसमोर साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या काळात कचऱ्यातून निर्माण होणारा सडलेला वास तसेच त्यावर वाढणारे डास रोगराई पसरण्याचा धोका वाढवत आहेत.
याशिवाय कचऱ्यावर भटक्या श्वानांचा वावर वाढला असून शाळेत जाणारी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना त्रासदायक प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. भाजी मंडई, हॉटेल्स, खानावळी यांच्या कचरा संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे, कचरा संकलनावर अतिरिक्त ताण येत आहे. त्यासाठी स्वतंत्र कचरा संकलन वाहनांची व्यवस्था करणे आणि त्या प्रकारची जनजागृती व प्रबोधनाची गरज व्यक्त केली जात आहे.

वाहने नादुरुस्त
दैनंदिन कचरा संकलनासाठी सद्यस्थितीत आठ कचरा संकलन वाहने असून जुनी सांगवी प्रभागासाठी ही वाहने कमी पडत आहेत. त्यात अनेकदा वाहने नादुरुस्त असल्याने कचरा संकलन व्यवस्थित होत नाही. गेल्या सहा महिन्यांपासून वाहने वाढविण्यात याव्यात, अशी नागरिकांमधून मागणी आहे. मात्र, अद्याप मनुष्यबळ व उपलब्ध कचरा संकलन वाहनांवर जुनी सांगवी परिसराची स्वच्छता अवलंबून आहे.

आम्ही दररोज सकाळी घराबाहेर येतो. तेव्हा, कचऱ्याचा दुर्गंधीने दमछाक होते. महापालिकेच्या यंत्रणेने हे दुर्लक्ष थांबवले पाहिजे.
- गणेश ढोरे, नागरिक

शाळेत जाणाऱ्या मुलांना भटक्या श्वानांचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने भटके श्वान आणि कचरा संकलन या दोन्ही गोष्टींवर तातडीने उपाययोजना करावी.
- अमित बाराथे, रहिवासी, मुळानगर

कचरा संकलन नियमित सुरू आहे. जादा कचरा संकलन वाहनांची मागणी केलेली आहे. रात्री पडणारा कचरा रोखण्यासाठी कर्मचारी नेमण्यात येईल.
- संदीप राठोड, आरोग्य निरीक्षक, जुनी सांगवी


नागरिकांच्या मागण्या
- कचरा संकलन नियमित आणि वेळेवर करावे
- कचरा संकलन वाहनांची संख्या वाढवावी
- रात्री टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याला प्रतिबंध करावा
- भटक्या श्वानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यवाही करावी
- नियमित जंतूनाशक फवारणी करावी
- भाजी मंडई, हॉटेल, खानावळींसाठी स्वतंत्र व्यवस्था हवी

कचरा संकलनाची सद्यस्थिती
जुनी सांगवी परिसरात सध्या आठ कचरा संकलन वाहनांद्वारे कचरा संकलित केला जातो. मात्र, ही संख्या अपुरी आहे. कचरा संकलनासाठी अजून ८ वाहनांची गरज आहे. कचरा संकलनासाठी १८ महापालिका कामगारांसह ३५
कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. मात्र, त्यांचीही संख्या अपुरी पडत आहे.


PIM25B20188

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump : २४ तासांत आणखी टॅरिफ लावणार! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा भारताला धमकी....

Latest Maharashtra News Updates Live : अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वी बीडमध्ये बॅनर वॉर

मी ज्या नोटांवर नाचले त्या खोट्या... बेस्टच्या पार्टीमधील व्हिडिओवर माधवी जुवेकरचं स्पष्टीकरण; म्हणाली, 'फक्त माझ्याच बातम्या...

ENG vs IND: शुभमन गिल इंग्लंड दौऱ्यातून 'या' दोन खास गोष्टी घेऊन जाणार; फोटो आले समोर

Mumbai Local: आता लोकलचा वेग आणखी वाढणार! प्रशासनाकडून या मार्गांवरील वेगमर्यादा शिथिल

SCROLL FOR NEXT