जुनी सांगवी, ता. ३० ः पिंपळे निलख परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी मंडळांनी भव्य पौराणिक देखावे, आकर्षक विद्युत रोषणाई करून गणरायाला विराजमान केले आहे. रिमझिम पावसातदेखील नागरिक देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. गावठाण, विशालनगर, जगताप डेअरी आणि वाकड रस्त्यावरील मंडळांच्या विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे. मंडळांची सजावट नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. विविध ढोल-ताशा पथकांचे वादन, सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रम, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध कला-कौशल्य स्पर्धात्मक कार्यक्रमांनी यंदाचा गणेशोत्सव मंगलमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे.
पिंपळे निलख
विविध कार्यक्रमांची रेलचेल
पिंपळे निलख येथील कै. संदेश साठे पाटील प्रतिष्ठान (पिंपळे निलखचा राजा) यावर्षी रंगीबेरंगी कापडी महालात आकर्षक सजावट करून गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. मंडळाचे स्थापना वर्ष १९९७ असून यशोधन साठे हे अध्यक्ष आहेत. सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमावर यावर्षी मंडळाने भर दिला आहे. ढोल ताशा पथकांचे स्थिर वादन व भव्य मिरवणूक हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे.
आकर्षक पौराणिक गणेश महाल
श्री गणेश मित्र मंडळ (पिंपळे निलखचा विघ्नहर्ता) मंडळाने यावर्षी आकर्षक पौराणिक गणेश महालात गणरायाला विराजमान केले आहे. मंडळाचे स्थापना वर्ष १९९० असून, सागर साठे हे अध्यक्ष आहेत. मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जातात.
आकर्षक विद्युत रोषणाई
शिवाजी चौक मित्र मंडळाने यावर्षी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. संगीतमय विद्युत रोषणाई भाविकांना भुरळ घालत आहे. मंडळाच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. स्थापना वर्ष १९८९ आहे. आशिष कुंभार हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
आकर्षक दिव्यांची विद्युत रोषणाई
श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळाने यावर्षी दिव्यांची विद्युत रोषणाई केलेल्या मंदिरात गणरायाला विराजमान केले आहे. मंडळाचे स्थापना वर्ष १९५६ आहे. अध्यक्ष दिनेश टकले आहेत.
शंकर महादेवाचा पौराणिक देखावा
विशालनगर येथील श्री गणेश मित्र मंडळाने शंकर महादेवाचा पौराणिक देखावा सादर केला आहे. मंडळाचे स्थापना वर्ष १९९७ असून, अध्यक्ष रोहन थोपटे आहेत.
लक्षवेधी विद्युत रोषणाई
विशालनगर नवविकास तरुण मंडळाने केलेली आकर्षक विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरत आहे. मंडळाने यावर्षी सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. मंडळाचे स्थापना वर्ष १९८६ असून, रोहित भोंडवे हे अध्यक्ष आहेत.
फुलांची आरास
क्रांती मित्र मंडळाने फुलांची आकर्षक आरास केली आहे. सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमावर भर दिला आहे. मंडळाचे स्थापना वर्ष १९८५ आहे. सिद्धेश साठे अध्यक्ष आहेत.
आकर्षक सजावट
शिवाजी तरुण मंडळाने यावर्षी आकर्षक सजावट करून गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मंडळाकडून विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम वर्षभर राबविले जातात.
मनोरंजनात्मक कार्यक्रम
नवनाथ मित्र मंडळाने यावर्षी भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. आकर्षक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. मंडळाच्या वतीने मनोरंजनात्मक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे स्थापना वर्ष २००५ आहे. बाळासाहेब चोंधे हे अध्यक्ष आहेत.
जगन्नाथ पुरी देखावा
श्री छत्रपती क्रीडा (गावठाण) मंडळाने जगन्नाथ पुरी हा आकर्षक सजावट केलेला देखावा साकारला आहे. मंडळाकडून विविध सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. मंडळाचे स्थापना वर्ष १९८० असून बाळासाहेब इंगवले हे अध्यक्ष आहेत.
वटवृक्षाखाली प्रतिष्ठापना
छत्रपती युवा प्रतिष्ठानने वटवृक्षाखाली गणपतीची प्रतिष्ठापना करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. आकर्षक सजावट करून सुंदर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांसाठी मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. मंडळाचे स्थापना वर्ष २०१५ आहे. दिग्विजय साठे हे अध्यक्ष आहेत.
विविध सामाजिक उपक्रम
कै. ज्ञानोबा चौंधे प्रतिष्ठान व कै. सुरेश चोंधे फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे. प्रतिष्ठानचे यंदाचे २५ वे वर्ष आहे. आरती चोंधे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत.
गणेश महल
हिंद मित्र मंडळाने यावर्षी आकर्षक सजावट करून गणेश महालात गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. मंडळाच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. मंडळाचे स्थापना वर्ष १९९५ आहे. मंडळाचे अध्यक्ष शरद बावधन आहेत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.