पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडचे नाव देशभरात व्हावे एवढा मोठा महोत्सव व्हावा ः डॉ. पटेल

CD

पिंपरी, ता. २० ः ‘‘पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नाव संपूर्ण देशभरात व्हावे एवढा मोठा नाट्य महोत्सव येथे व्हावा. महापालिकेने त्यासाठी सक्रिय पुढाकार घ्यावा. पुढील वर्षी हा महोत्सव पाच दिवसांचा असावा,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक डॉ.‌ जब्बार पटेल यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘रंगानुभूती-नाट्य प्रयोग कला महोत्सवा’चा प्रारंभ शुक्रवारी (ता. १९) ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात झाला. या वेळी डॉ. पटेल यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महापालिकेचे क्रीडा विभाग उपायुक्त पंकज पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला अकादमीचे प्रमुख प्रवीण भोळे, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस रंगमंचचे संस्थापक प्रभाकर पवार आदी उपस्थित होते.
औद्योगिकनगरी असलेल्या या शहराची ओळख या नाट्यमहोत्सवामुळे कला विश्वातही अग्रस्थानी घेतले जाईल. महापालिकेच्या भरीव मदतीमुळे शहराच्या सांस्कृतिक विकासाला चालना मिळत असल्याचे कौतुक डॉ. पटेल यांनी केले. १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान हा महोत्सव ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडत आहे.
मराठीसोबतच अन्य भाषांतील नाटके पाहण्याची संधी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारा नाट्यमहोत्सव म्हणजे ‘रंगानुभूति: नाट्य महोत्सव’ अशी ओळख पुढील काळात निर्माण होईल, असा विश्वास प्रवीण भोळे यांनी व्यक्त केला.
‘‘रंगानुभूती हा नाट्य महोत्सव दरवर्षी महापालिका आयोजित करणार असल्याचे पंकज पाटील यांनी सांगितले. पुढील काळात पिंपरी-चिंचवड महापालिका सांस्कृतिक दृष्ट्याही श्रीमंत होईल, यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविक प्रभाकर पवार यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मिलिंद बावा आणि तेजस्विनी गांधी-कुलकर्णी यांनी केले. यावेळी श्री इदागुणजी महागणपती यक्षगान मंडळी केरेमाने कर्नाटक यांचे ‘पंचवटी’ ही कथानाट्य असलेली यक्षगान प्रयोगकला सादर करण्यात आली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath warning : दिशा पाटणीच्या घरावर गोळीबार प्रकरण; आता खुद्द मुख्यमंत्री योगींनी दिलाय कडक इशारा!

Thane Crime: ...माझ्या सोबत येतेस का! मार्केटमध्ये महिलेसोबत धक्कादायक कृत्य, जमावानं मद्यपीला शिकवला धडा!

Latest Marathi News Live Update : अखेर शासकीय ज्वारी खरेदीस मुदतवाढ

IND vs OMN सामन्यातील 'इम्पॅक्ट प्लेअर' चा पुरस्कार कोणाला मिळाला? BCCI चा Video पाहून व्यक्त कराल आश्चर्य, संजू सॅमसन दुर्लक्षित

बँकेत जमा केले ५०० रुपये अन् काढले ५ कोटी..२३ वर्षीय मुलगा बनला कोट्यधीश, पण शेजाऱ्यांनी त्याचा बाजार उठवला, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT