पिंपरी-चिंचवड

दापोडी परिसरातील रस्त्यांची डागडुजी सुरू

CD

सकाळ इम्पॅक्ट

जुनी सांगवी, ता. ९ ः दापोडी परिसरातील गल्ल्या, मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांच्या डागडुजी, डांबरीकरणाच्या कामांना महापालिका प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. दापोडी गावठाण, बॉम्बे कॉलनी आदी ठिकाणी स्थापत्य विभागाकडून ही कामे करण्यात येत आहेत.
दापोडी परिसरातील रस्ते अत्यंत खराब अवस्था झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालकांना दररोज त्रास सहन करावा लागत होता. शितळादेवी चौक, पिंपळे गुरव रस्ता भागांत पावसाळ्यानंतर रस्त्यांची स्थिती खड्डेमय आहे. अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने अपघातांना सामोरे जावे लागते. स्थानिक नागरिक व समाजसेवी संस्थांनी सातत्याने प्रश्न मांडला होता. या संदर्भात ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर प्रशासनाने त्याची तत्काळ दखल घेण्यात आली. स्थापत्य विभागाकडून संयुक्त पाहणी करुन रस्त्यांचे डांबरीकरण व डागडुजीच्या कामांना सुरुवात करण्यात आली.
काही महिन्यांपूर्वी पाणीपुरवठा विभागाकडून दापोडी - पिंपळे गुरव रस्त्याकडेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते शितळादेवी मंदिर चौक रस्ता येथे खोदकाम करून माती-मुरूम टाकून बुजविण्यात आला होता. त्याबाबत नागरिकांना त्रास होत होता. त्याचीही दखल घेण्यात आली आहे. मुख्य रस्त्यांचे आवश्यक ठिकाणी डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे स्थापत्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात अंतर्गत रस्ते, गल्‍ल्या व नंतरच्या टप्प्यात मुख्य रस्त्यांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले आहे.

अंतर्गत खड्डेमय रस्त्यांची डांबरीकरण करून डागडुजी दुरुस्ती करण्यात सुरुवात करण्यात आली आहे. मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण पुढील आठवड्यात करण्यात येईल.
- कल्याणी वाघमारे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) दापोडी विभाग

PIM25B20564, PIM25B20565

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT